त्या मुलापासून माझ्या मुलीला व माझ्या परिवाराच्या जीवितास धोका-वडिलांची पोलीस ठाण्यात तक्रार
नंदूरबार प्रतिनिधी: मला व माझ्या मुलगीला कुमारी प्रमिला लालसिंग पावरा हिला फोनवर जीवे ठार मारण्याची धमकी देणा-या व सोशल मिडीयावर आमची बदनामी करणा-या संशयीत आरोपी तुकाराम मान्या पावरा याच्यावर पोलीस ठाणे धडगांव येथील फिर्यादीनुसार तात्काळ अटक करा,या मागणीसाठी मुलीचे वडील लालसिंग पावरा व परिवाराने थेट पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार गाठले.
लालसिंग वेस्ता पावरा ,वय ४५ राहणार कुसुमवेरी तालुका धडगांव जिल्हा नंदुरबार यांनी पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे धडगांव जिल्हा नंदुरबार यांना दिनांक ०८ ऑगस्ट २०२५ रोजी एक फिर्याद दाखल केलेली आहे.तुकाराम मान्या पावरा नावाचा मुलगा ८७६७२८७१३०,या मोबाईल नंबरवरून ९४२०००२५५२, ९४२०४०२७०७ या मोबाईल नंबरवर सारखा फोन लावून जीवे ठार मारण्याची धमकी देत असतो आणि माझ्या व माझ्या मुलगीचे सोशल मिडीयाद्वारे,वाॅटसप स्टेटस, इन्टाग्राम स्टेटस सारख्या वर अनेक ठिकाणी बदनामी केली आहे व करत आहेत त्याबाबत कायदेशीर कारवाई करावी, अशी फिर्याद दाखल केलेली आहे. जिल्हाध्यक्ष बिरसा फायटर्स नंदूरबार यांच्याकडे लालसिंग पावरा यांनी दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी एक तक्रार अर्ज पाठवला आहे.बिरसा फायटर्सने मुलगीला व आईवडीलांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.दरम्यान तुकाराम पावरा या मुलानेही बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडे एक तक्रार अर्ज केला आहे.मुलीकडून मला प्रेमात धोका मिळाला आहे,मुलीच्या वडिलांनी मला मारहाण केली असल्याची तक्रार केली आहे.
धडगांव पोलीस ठाण्यात ८ ऑगस्ट २०२५ रोजी तक्रार दाखल करूनही अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.मला स्वतःला ,माझ्या पत्नीस व मुलगीला संशयीत आरोपी तुकाराम मान्या पावरा राहणार राजबर्डी तालुका धडगांव जिल्हा नंदुरबार याच्याकडून जीवितास धोका आहे.मुलगा आतंकवादीसारखा वागतो.आमचे जीवाचे काही बरेवाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदार तुकाराम पावरा याला धरण्यात यावे.तरी संशयीत आरोपी तुकाराम मान्या पावरा याला तात्काळ अटक करण्यात यावी.अशी मागणी लालसिंग पावरा यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
0 Comments