मानधन तत्वावर फक्त ख-या उमेदवारांना नियुक्ती द्या- बिरसा फायटर्सची मागणी
नंदूरबार प्रतिनिधी: शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ नुसार पेसा क्षेत्रातील कार्यरत १२६ कंत्राटी शिक्षकांना मानधन आदेश गुणवत्तेनुसार व टीईटी प्रतिबाधित (फ्राॅड) यादीतील उमेदवारांना वगळून द्यावी,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,प्राध्यापक सा-या पाडवी,मंगल वसावे,दिनेश वसावे,सायसिंग वसावे,रमेश वसावे,निमजी वसावे,दिल्या वसावे,शिमल्या वसावे,खुमानसिंग वसावे, केल्ला वसावे,ईश्वर वसावे,बाज्या वसावे,सत्या वसावे,प्रविण वसावे,पाश्या वसावे, गणेश वसावे,कालूसिंग वसावे,दित्या वसावे,सिंगा वसावे,भिका वसावे,सोन्या वसावे,रणजित वसावे,जयश्री वसावे,गुलाबसिंग वसावे इत्यादी ४० पेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे कडील पत्रान्वये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ नुसार पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवारांना तात्पुरत्या कालावधी करिता २०,००० रूपये मानधन तत्वावर अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने उमेदवारांना २९/०८/२०२४ ते २८/०७/२०२५ अखेर ११ महिन्यांकरिता मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांनी दिनांक ३१/०७/२०२५ रोजीच्या आदेशानुसार शिक्षण विभागातील जिल्हा परिषद शाळांत १०५ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे.
१२६ उमेदवारांपैकी १२ उमेदवार हे टीईटी फ्राॅड उमेदवार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. १२६ उमेदवारांना नियुक्ती देताना या १२ टीईटी फ्राॅड उमेदवारांची स्वतंत्र यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. १२६ कंत्राटी उमेदरांपैकी १०१ कंत्राटी उमेदवारांची ३१/०७/२०२५ रोजी मुदत संपली व २५ उमेदवारांची १०/११/२०२५ रोजी मुदत संपेल.नव्याने नियुक्तीपत्र देतांना १२ फ्राॅड उमेदवारांनाचाही ख-या पात्र उमेदवारांसोबत यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.पवित्र पोर्टल वरील १०८ उमेदवार मानधन तत्वावर लागले परंतू ते नंदूरबार शिक्षण विभागात हजर झाले नाहीत, अन्य ठिकाणी लागलेले आहेत. त्यांच्या रिक्त जागा झाल्यानंतर मानधन तत्वावर १०८ उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे.या भरतीत ख-या व पात्र उमेदवारांवर अन्याय होणार नाही,याची दक्षता घेण्यात यावी.या मानधन तत्वावराच्या भरतीत १२६ पैकी १२ फ्राॅड उमेदवारांना वगळून प्राधान्याने व गुणवत्तेनुसार उर्वरित ११४ उमेदवारांना मानधन तत्वावर नियुक्त करण्यात यावेत.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून सीईओ यांच्याकडे करण्यात आली आहे.
0 Comments