खुनाचा मुख्य सुत्रदार पुढारी कोण? पोलिसांकडून शोध सुरू
नंदूरबार प्रतिनिधी: नंदुरबार शहरात बॅनर लावण्याच्या वादातून मोहीत राजपूत यांचा खून करणा-या संशयीत आरोपीविरुद्ध व मुख्य सूत्रधारावर खूनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा,अशी मागणी बिरसा फायटर्स, भारतीय स्वाभीमानी संघ,बिरसा आर्मी,भारत आदिवासी संविधान सेना इत्यादी आदिवासी संघटनांकडून पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,भारतीय स्वाभीमानी संघाचे प्रदेश सचिव रोहीदास वळवी,जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,नंदूरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी,बिरसा आर्मीचे नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
नंदुरबार शहरात बॅनर लावण्याच्या वादातून मोहित राजपूत या युवकाला जीवे ठार मारल्याची घटना घडली आहे.या घटनेचा आम्ही आदिवासी संघटनांकडून जाहीर निषेध व्यक्त करतो.या घटनेतील पाच संशयीत आरोपीविरुद्ध भारतीय न्याय दंड संहिता कलम १०३(१),३(५) अन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदूरबार शहरात बॅनर वादातून मोहित राजपूत याला जीवे ठार मारण्याच्या उद्धेशाने सिद्धीविनायक चौकात राहणा-या सुनिल ज्ञानेश्वर राठोड व त्यांच्या साथीदारांनी लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली.या मारहाणीत मोहित राजपूत हा गंभीर जखमी झाला,त्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर सुरत येथे रूग्णालयात नेण्यात आले.परंतू रूग्णालयात त्याची प्राणज्योत मावळली. मयत हा घरातला एकमेव कमावता असल्यामुळे पश्चात मयतची पत्नी व लहान बालके यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.या प्रकरणात जयेश राजपूत राहणार नवनाथनगर नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून सुनिल ज्ञानेश्वर राठोड, मुकेश राजपूत, संजय तलवार, हर्षवर्धन मराठे,अनिकेत तवर , माजी नगरसेवक दिपक दिघे सर्व राहणार नंदुरबार शहर यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयीत सहा आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी मोहित राजपूत याचा खून करायला लावणारा मुख्य सूत्रधार राजकीय पुढारी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.कारण या खुनाच्या गुन्ह्यातील संबंधित आरोपी हे नंदुरबार शहरातील एका मोठ्या पुढा-यासाठी कामे करतात, आरोपी हे त्या पुढा-याची माणसे आहेत, आरोपींची फोटो त्या पुढा-या सोबत आहेत.तो मुख्य सुत्रदार पुढारी कोण आहे? त्याचा शोध घेऊन मुख्य सुत्रदाराविरूद्ध व संशयीत आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी ,अन्यथा आदिवासी संघटनांकडून येत्या ४-५ दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
0 Comments