प्रतिनिधी शंकरसिंग ठाकूर:-ना अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिम्मित श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्चं माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना 2000 वृक्ष व गरजूना 2000 वाह्यांचे वाटपाचा कार्यक्रम डॉ सुजित शेलार यांच्या माध्यमातून संपन्न झाला. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरूर चे ता अध्यक्ष श्री रविबापू काळे व जिल्हा उपाध्यक्ष श्री महेशबापू ढमढेरे तसेच महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस सौ तृप्तीताई सरोदे उपस्थित होत्या.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभागीय सदस्य श्री काकासाहेब खळदकर यांनी विद्यालयाची प्रगती व भौतिक सुविधा उभारणीतील लोकसहभागाचा उल्लेख करत उर्वरित इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी मा आ. माऊली आबा कटके यांच्या माध्यमातून सहकार्य मिळावे व सी एस आर फंडातून इमारत पूर्णत्वास न्यावी अशी मागणी केली. या प्रसंगी बोलताना मा महेशबापू ढमढेरे यांनी शिक्षणाचे महत्व सांगताना सर्वांनी या कामी सहकार्याची भूमिका घेत काम पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले व शाळेच्या विकासकामासाठी रोख रक्कम 5000 रुपयांची देणगी दिली. तर आध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री रविबापू काळे यांनी मा आ. श्री माऊली आबा कटके यांच्या माध्यमातून सी एस आर फण्ड उपलब्ध करून देऊ असे सांगितले.
यावेळी शिरूर तालुक्यात 400000 हजार वृक्ष लागवाडीचा संकल्प करणारे श्री उमेश रणदिवे यांनी वसुंधरेच्या रक्षणासाठी वृक्षरोपणाचे महत्व सांगताना विविध वृक्षाचे गुणधर्म सांगत विद्यार्थ्यांना वृक्षालागवाडीचे व संगोपणाचे महत्व सांगितले. यावेळी अनेक मान्यवारांनी आपलें मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सुजित शेलार यांनी केले तर स्वागत प्राचार्य श्री दिवे सरांनी केले तर सूत्रसंचालन व आभार श्री चंद्रशेखर काकडे सर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास वडगाव रासाई चे सरपंच श्री सचिन दादा शेलार, कुंडलिकराव शितोळे, राहूल रणदिवे, दादासाहेब ढवळे, बबन निवृत्ती ढवळे, श्री वीरेंद्र शेलार, सोमनाथ शेलार, डॉ अनिल शेलार, श्री भैय्या देशमुख, तात्यासाहेब शेलार , विलासतात्या शेलार, मीनानाथ ढवळे, धनंजय ढवळे, नागरगावचे शरद साठे श्री सुधीर फराटे, काकासाहेब शेलार, गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री नंदकुमार मगर सर गुंड सर, वळवी सर, मेंडके सर, गायकवाड सर, झिंगाडे सर व श्री कांडगे सर यांच्यासह सर्व गुरुदेव कार्यकर्ते व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थांनी परिश्रम घेतले.
0 Comments