Advertisement

गणोर येथे गुण- गौरव व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न...

आज दि. 28/5/2025 रोजी गणोर येथे इ.१० वी , इ.१२ वी उत्तीर्ण विद्यार्थी गुणगौरव, नूतन नोकरदार अभिनंदन व निवृत्तांचा सन्मान कार्यक्रम आई गिरहुण कर्मचारी सेवा संघ व युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून विद्याश्रम अकॅडमीचे(लोणखेडा) संचालक श्री. दिनेश पावरा सर , प्रमुख पाहुणे म्हणून श्री.नामदेव पटले साहेब ,कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच सौ. शितल राहुल रावताळे, उप सरपंच श्रीमती.कविता वळवी, सर्व ग्राम पंचायत सदस्य ,आई गिरहुण कर्मचारी सेवा संघाचे अध्यक्ष श्री. चंपालाल निकुम साहेब व पदाधिकारी, बचत गटातील महिला, सामाजिक कार्यकर्ते, युवक-तरूण मित्र मंडळ आदी उपस्थित होते. शिक्षण हे आपल्याला वाचन आणि लिहिण्याची क्षमता शिकवते. वाचन आणि लेखन ही शिक्षणाची पहिली पायरी आहे. शिक्षणामुळे लोक साक्षर होतात.शिक्षणामुळे आपल्याला करिअरच्या संधी प्रदान होत आहेत ज्यामुळे आपले जीवनमान चांगले होऊ शकते. शिक्षण हा अंधारात प्रकाशाचा किरण आहे,असे प्रतिपादन दिनेश पवार सर यांनी दिले. श्री नामदेव पटले साहेब, श्री चंपालाल निकुम साहेब , राहुल रावताळे, यांच्यासह उपस्थितांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. ह्यावेळी प्रा.बन्सीलाल भामरे, डॉ गोविंद शेल्टे, उत्तम निकुम, संतोष रावताळे, बलदेव पवार , लक्ष्मण खर्डे, भास्कर निकुम, दिलीप शेल्टे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री करणसिंग तडवी व अभिलाष निकुम यांनी केले,तर आभार प्रदर्शन श्री.चंपालाल निकुम साहेब यांनी केले.

Post a Comment

0 Comments