Advertisement

विश्व सेवा मंडळ शिरपूर संस्थे मार्फत, नुकत्याच आयोजित कॅम्पस मुलाखतीत 5 विद्यार्थ्यांची ब्लॉक प्लेसमेंट ट्रेनिंगसाठी निवड



 मोराणे प्रतिनिधी :- प्रकाश नाईक

 मोराणे :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना सांगताना आनंद होत आहे की, विश्व सेवा मंडळ शिरपूर या संस्थेमार्फत नुकत्याच आयोजित कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातून एकूण ०५ विद्यार्थ्यांना स्टायपेंड सह ब्लॉक प्लेसमेंट ट्रेनिंग साठी निवड करण्यात आली आहे. त्या
पैकी सध्या अरुणा मराठे यांची खास नोकरी करीता निवड करण्यात आली आहे. 
        सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रा. उषा वाघ अध्यक्ष, समता शिक्षण संस्था पुणे व मा.डाॅ.जालिंदर अडसुळे, सचिव,समता शिक्षण संस्था पुणे व सर्व व्यवस्थापन सदस्य आणि प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ, समन्वयक प्रा.डॉ. सुदाम राठोड,डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्गाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. व पुढील वाटचालीस निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहे.

Post a Comment

0 Comments