Advertisement

धडगांव शहरात पोलिसांच्या आशिर्वादाने खुलेआम अवैद्य धंदे सुरू!



पोलीस अधीक्षकांना बिरसा फायटर्सचे निवेदन

धडगांव प्रतिनिधी: धडगांव शहरात सट्टा- मटका, जुगार खेळणा-यांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा १८८७ नुसार कायदेशीर कडक कारवाई करा,तालुक्यातील अवैद्य धंदे बंद करा,अशी मागणी पोलीस अधीक्षक नंदूरबार श्रवण दत्त यांच्याकडे बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक नंदूरबार यांना ईमेल द्वारे पाठविण्यात आले आहे.
                        नंदुरबार जिल्ह्य़ातील अवैद्य धंदे बंद करण्यासाठी आपण चांगले काम करत आहेत. परंतु स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने जिल्ह्य़ातील तालुक्याच्या ठिकाणी अवैध धंदे सुरूच आहेत. सट्टा- मटका,जुगार, विमल गुटखा विक्री, गांजा,दारू विक्री असे अनेक अवैद्य धंदे जिल्ह्य़ात खुलेआम सुरू असल्याच्या बातम्या नेहमीच येत आहेत.अशे अवैद्य धंदे बंद करण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे.
                      धडगांव तालुक्यात धडगांव शहरातच डीडीसी बॅन्क, बीएसएनएल ऑफिस जवळ सट्टा- मटका,जुगार खुलेआम खेळला जात आहे.तसे सोशल मिडीयावर विडीओज वायरल होत आहेत.
सट्टा जुगार खेळणा-या ठिकाणी विमल गुटखा खाणा-यांची संख्या अधिक असून विमल गुटखाच्या पुड्या पडल्या आहेत,तेथे विमल गुटख्यांमुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.या परिसरात रोज सट्टा मटका ,जुगार खेळणा-यांची संख्या वाढली असून रोज जुगार खेळणाऱ्यांचे हे ठिकाण सट्टा- जुगार हड्डा बनला आहे.सट्टा खेळणा-यांचा धडगांव शहरातील रहिवाशांना प्रचंड त्रास होत आहे.हे सट्टा - जुगार खेळणारे लोक पोलिसांना हफ्ते देतात, म्हणून पोलिसांच्या आशिर्वादाने शहरात सट्टा मटका सुरू आहे,असे लोक चर्चा करत आहेत. या सट्टेबाजांमुळे अनेक सुखी संसार उद्ध्वस्त झाले आहेत. 
 सट्टा मटका-जुगार खेळणा-या या लोकांनी धडगांव शहराचे वातावरण बिघडवून ठेवले आहे. शाळकरी व काॅलेज च्या विद्यार्थ्यांवर तसेच सुशिक्षित तरूणांवर ही याचा वाईट परिणाम होत आहे. धडगांव पोलीस ठाण्यातील पोलीस श्री. वसईकर यांच्या घरातच गांजा सापडल्याची घटना घडल्यामुळे स्थानिक पोलिसच अशा अवैद्य धंद्यात शामिल असल्याचे बोलले जात आहे.धडगांव शहरात सट्टा- मटका ,जुगार खेळणा-यांवर महाराष्ट्र गॅमलिंग प्रतिबंधक कायदा १८८७ अनुसार कायदेशीर कडक कारवाई करावी.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून पोलीस अधीक्षक नंदूरबार श्रवण दत्त यांच्याकडे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments