विश्व मानव रुहाणी केंद्र नोंदणी कायदा 1860 अंतर्गत झाले
प्रतिनिधी:-विश्व मानव रुहानी केंद्र ही एक ना-नफा धर्मादाय संस्था आहे जी 2005 पासून मानवतेची सेवा करत आहे. विश्व मानव रुहानी केंद्र सोसायटी नोंदणी कायदा 1860 आणि हरियाणा सोसायटी नोंदणी आणि विनियमन कायदा 2012 अंतर्गत नोंदणीकृत आहे. आमचे मुख्यालय नवानगर, पोस्ट ऑफिस नानकपूर, तहसील कालका, जिल्हा पंचकुला, हरियाना भारत येथे आहे. संपूर्ण भारतभर सुमारे 259 रीट्रीट सेंटर आहेत, ज्यांना मानव केंद्र म्हणतात.
आमची संस्था नेहमीच वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक सेवांसाठी सेवाभावी सामाजिक सेवा कार्यक्रमांमध्ये सक्रिय राहून विद्यार्थी, अनाथ, आजारी आणि वृद्धांना मदत करते, तसेच आठवल्यात मोफत वैद्यकीय शिबीर आयोजित करते ज्यात मोफत वैद्यकीय सल्ले आणि औषध दिली जातात. तसेच पंच कैलाश मनी महेश, आदी कैलाश, किन्नर कैलाश श्रीखंड कैलाश व अमरनाथ तसेच नैना देवी य ठिकाणी मोफत वैद्यकीय शिबीर लावण्यात येतात.
हे सर्व सेवाभावी उपक्रम आध्यात्मिक संत बलजीत सिंह जी यांच्या निरंतर प्रेरणेने प्रेरित असून याच्या नियोजनाखाली काम करते.
या संदर्भात सलग तिसर्या वर्षी चैत्र उस्तव २०२५ श्री. सप्तशृंगी निवासिनी देवी, वनी गड नाशिक येथे दि. ८ एप्रिल २०२५ पासून १२ एप्रिल २०२५ पावेतो भाविकांनी मोफत अन्न सुविधा (लंगर) आणि मोफत आरोग्य तपासणी/वैद्यकीय शिबीर लवणात आले. यामध्ये 5,255 हून अधिक रुग्णांवर ५ डॉक्टर ३ फार्मसीस्ट आणि सेवादाराच्या मदतीने मोफत औषधउपचार करण्यात आलें तसेच 37,290 हून अधिक भाविकांनी मोफत अन्न सुविधा (लंगर) देण्यात आले. यामध्ये एकूण 288 स्वयंसेवकांनी संत बलजित सिंह जि याच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली शिकवलेल्या नैतिकतेच्या आधारे उत्कृष्ट सामाजिक योगदान दिले आहे.
नवरात्री आणि कोजागिरी उत्सवादरम्यान सुद्धा सप्तशृंगी निवासिनी देवी, वनी गड नाशिक येथे आरोग्य तपासणी/वैद्यकीय उपचार शिबिर तसेच अन्न सुविधा (लंगर) उत्कृष्ट पाठबळ आणि सामाजिक योगदानाबद्दल विश्व मानव रुहानी केंद्राच्या व्यवस्थापनाने दिले.
कर्म, धर्म आणि सहकार्य या दोन्ही धार्मिक व सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून श्री. सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्ट, श्रीक्षेत्र सप्तश्रृंग गड आणि विश्व मानव रुहानी केंद्र, नवनगर या तिसऱ्यांदा एकत्र येऊन भाविकांच्या सेवेत जास्तीत जास्त योगदान देत आहेत. भाविकांच्या सेवेसाठी हा ऋणानुबंध पुढील काळात अधिक प्रभावीपणे चालू राहील या आशेने, या सेवाभावी कार्यात योगदान देणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो असे श्री. सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट येथील साहेबांनी आभार व्यक्त केले.
विश्व मानव रुहानी केंद्राच्या संत बलजित सिंह जी व याच्या माजिक कार्यकर्त्यांनी अतिशय प्रेमाने, आदराने आणि उत्साहाने सेवा केली. गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेमार्फत अशा प्रकारचे समाजसेवेचे कार्य केले जात असल्याचे विश्व मानव रुहानी केंद्राच्या सदस्यांनी सांगितले. आणि भविष्यातही विश्व मानव रुहानी केंद्र अशा समाजसेवेच्या लोककल्याणकारी कामात प्रशासनाला सहकार्य करत राहील.
0 Comments