अक्कलकुवा प्रतिनिधी: विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती अक्कलकुवा तालुक्यातील दहेल या गांवात धुमधडाक्यात साजरा करण्यात आली.शासकीय आश्रमशाळा दहेल येथून ढोल वाजवत नाचत गाजत रॅली काढण्यात आली.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,क्रांतिवीर बिरसा मुंडा की जय, कलम का बादशाह जय भीम अशा जोरदार घोषणा रॅलीत देण्यात आल्या.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समाज प्रबोधन सभा आयोजित करण्यात आली.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवीर बिरसा मुंडा,आदिवासी कुलदैवी याहा मोगी माता,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.आश्रमशाळेतील विद्यार्थींनींनी स्वागत गीत सादर केले.आयोजक राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद नंदूरबार संघटनेतर्फे उपस्थित सर्व मान्यवरांचे पुस्तक व कॅलेंडर देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर उद्घाटक डी.के.वसावे सर यांनी प्रास्ताविक पर भाषण आदिवासी बोली भाषेत केले.
शिक्षक संजय पावरा यांनी आपली आदिवासी संस्कृती व रूढी परंपरा सोडू नका,असे आदिवासी भोलीभाषेत प्रेक्षकांना समजावले.कार्यक्रमाचे वक्ते सुनिल देंडे सर खापर यांनी आंबेडकरांच्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले.कार्यक्रमाचे विशेष अतिथी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांमुळेच्या संविधानामुळे आज आपण चांगले जीवन जगत आहोत, अन्यथा गुलामगिरीत जगलो असतो, जातीभेद करणारी लोक आज सुद्धा आहेत ,त्यांच्याविरुद्ध आपल्याला लढावे लागेल, अन्याय करणा-या पेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो,म्हणून अन्याय सहन करू नका,असे जोरदार भाषण ठोकले.या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी चैतरभाई वसावा धारासभ्य डेडीयापाडा, वक्ते अजय सिंग पाडवी,ॲड रणजित पाडवी,लक्ष्मण वसावे,चंद्रसिंग वसावे,छगन वसावे,नरवाडे सर,रामढिगर साहेब तसेच विशेष अतिथीत डाॅ.सायसिंग वसावे,सागर कापुरे सर,ईश्वर वसावे,रामा वसावे,सुनिल तडवी,सिंगा वसावे उपस्थित होते.मनोजकुमार गावित साहेब यांनी अध्यक्षीय भाषण केले.
कार्यक्रमात सातपुडा परिसरातील शिक्षक, आरोग्यसेवक, कृषी सहायक, अंगणवाडी सेविका, आशासेविका, रेशन दुकानदार व सर्व क्षेत्रातील कर्मचारी सहभागी झाले.तसेच दहेल, कुणा,मोगरा,ओघाणी, चिखली,कोठली, ओढी, वालबा, खडकापाणी, ढाणा, टोकनपिंप्री, तिनखुण्या, मोरखी येथील युवा वर्ग तसेच आदिवासी महिला व पुरूष हजारोंच्या संख्येत उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व दहेल येथील गांवक-यांनी केले.
0 Comments