पोलीस अधिक्षक श्रवण दत्त यांना निवेदन;चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन
नंदूरबार प्रतिनिधी: शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी पिंपर्ळे व शिरूर दिगर येथील आदिवासी समाजातील पिडीत फिर्यादी व्यक्तीस जातीवाचक अश्लील शिवीगाळ करून मारहाण करणे,आदिवासी महिलांची तक्रार न घेणे,फिर्यादी आदिवासी व्यक्तीलाच लाॅकअपमध्ये बंद करून ठेवणे,मराठा समाजाच्या आरोपींनी मोकाट सोडून देणे व आदिवासी सामाजिक कार्यकर्ते तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना ,तुम्ही आदिवासींची बाजू घेतल्यास तुमच्यावरच बाईचा ३५४ चा गुन्हा दाखल करतो,अशी धमकी दिल्याबद्दल निलेश देसले यांच्यावर ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करा,पदावरून तात्काळ हटवा व शहादा पोलीस ठाणे अंतर्गत आदिवासींवर होणा-या अन्याय अत्याचारांसंबंधित मागण्यांसाठी तसेच अवैद्य व्यवसाय बंद करणे मागणीसाठी समस्त आदिवासी संघटना व आदिवासी,दलित समाजातर्फे दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय नंदुरबार समोर बेमुदत धरणे आंदोलन आंदोलन छेडण्यात येणार आहे.याबाबत पोलीस अधीक्षक नंदूरबार श्रवण दत्त यांनी तक्रार अर्जाची चौकशी करून तथ्य आढळल्यास कारवाई करतो,असे आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले आहे.यावेळी भारतीय स्वाभीमान संघाचे प्रदेश महासचिव रोहीदास वळवी,जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, विश्व आदिवासी सेवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष जितेंद्र बागूल, बिरसा आर्मीचे नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी,धडगांव तालुकाध्यक्ष अजय वळवी,भारत आदिवासी संविधान सेनेचे व बिरसा ब्रिगेडचे राज्य पदाधिकारी रवींद्र वळवी,सामाजिक कार्यकर्ते अंकित वळवी,अजय ठाकरे सह विविध आदिवासी संघटनांचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
शहादा तालुक्यातील पिंपर्ळे व शिरूर दिगर येथील आदिवासी व्यक्तीस जातीवाचक अश्लील शिवीगाळ करीत जबर मारहाण करणा-या व आदिवासी महिलांवर अन्याय अत्याचार करणा-या मराठा-गुजर समाजातील आरोपीविरुद्ध ॲस्ट्रासिटीचा व इतर गुन्हे दाखल करून अटक करा.मयत दिपाली चित्ते / पावरा हिच्या पोटात मुस्लीम कुरैशी याने पोटात चाकू खुपसून खून केल्या प्रकरणात सुरवातीला गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद करणा-या शहादा पोलीस ठाण्यात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करा व पोटात चाकू खुपसल्यानंतरही सिंपल इन्जूरी साधी दुखापत असा खोटा अहवाल बनवून पुढील योग्य उपचार न करणा-या उपजिल्हा रूग्णालय शहादा येथील डाॅक्टरवर गुन्हा दाखल करा ,कुलकर्णी हाॅस्पीटल शहादाची मान्यता रद्द करा. मयत दिपाली चित्ते / पावरा खून प्रकरणात दिपालीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलीस अधिकारी व उपजिल्हा रूग्णालय शहादा येथील डाॅक्टर व कुलकर्णी हाॅस्पीटल शहादा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणा-या,कायदेशीर कारवाई न करणा-या ,प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणा-या निलेश देसले पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा याच्यावर कायदेशीर कारवाई करा. शहादा तालुक्यातील आदिवासी अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या मराठा समाजाच्या आरोपींविरुद्ध पोस्को व बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक करा.पोलीस ठाणे शहादा येथील दिनांक १४ ऑगस्ट २०२४ ची तक्रार .शहादा पोलीस ठाण्यात पहिले विमल गुटखा खातो व नंतर तक्रार घेतो,असे पोलीस ठाण्यात ड्यूटीवर असतांना विमल गुटखा खाणा-या पोलिसांची सखोल चौकशी करून संबंधित पोलिसांना निलंबित करा.शहादा तालुक्यातील दारू,गुरखा,गांजा, सट्टा असे अवैद्य व्यवसाय बंद करा. शहादा पोलीस ठाण्यासंबंधित इतर तक्रारींवर कार्यवाही करा. अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
0 Comments