Advertisement

भ्रष्टाचारी किडे हटवा- बिरसा फायटर्स अधिक आक्रमक



डी.बी.बेलदार विस्तार अधिका-याला निलंबित करण्याची मागणी


शहादा प्रतिनिधी: शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत जवखेडा येथील सरपंच व ग्रामसेवक संतोष सुरसिंग गिरासे यांच्या मनमानी कारभाराची व भ्रष्टाचाराची चौकशी श्री.डी.बी.बेलदार विस्तार अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी चौकशी मध्येच थांबविली आहे,चौकशी न करून भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करून कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांना तात्काळ निलंबित करा,या मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून देण्यात आले आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, लोहारा ग्रामपंचायतचे उपसरपंच सुरेश पवार, जवखेडा ग्रामपंचायतचे सदस्य गणेश पाडवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                              गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना उपसरपंच,ग्रामपंचायत जवखेडा ता.शहादा यांनी दिनांक ०७/११/२०२४ रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता.त्यानंतर गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी श्री.डी.बी.बेलदार, विस्तार अधिकारी पंचायत समिती शहादा यांना दिनांक २४/१२/२०२४ रोजी चौकशीचा आदेश दिला होता.परंतू श्री.डी.बी.बेलदार विस्तार अधिकारी यांनी तक्रारदार उपसरपंच ग्रामपंचायत जवखेडा यांना अद्यापही चौकशीसाठीही बोलावले नाही की जबाब घेतला नाही.गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना बिरसा फायटर्स संघटनेकडून १७/०२/२०२५ रोजी निवेदन देण्यात आले. त्यानंतर श्री.डी.बी.बेलदार विस्तार अधिकारी हे ग्रामपंचायत जवखेडा येथे चौकशीला गेले,तेथे त्यांनी वरवर चौकशी केल्यानंतर भ्रष्टाचा-यांशी मॅनेज होऊन चौकशी मध्येच थांबविली आहे.अद्याप चौकशी अहवाल गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे सादर केलेला नाही.सदर चौकशी अधिकारी वरिष्ठांचे वारंवार चौकशी आदेश देऊनही चौकशी करण्यास टाळाटाळ करीत सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने केलेला भ्रष्टाचार,मनमानी व गैरकारभाराच्या चौकशीपासून वाचविण्याचा प्रयत्न केलेला आहे.वरिष्ठांच्या आदेशाचे वारंवार अवमान करून व भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालून कर्तव्यात कसूर करणा-या श्री.डी.बी.बेलदार शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती शहादा यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे व ग्रामपंचायत जवखेडा ता.शहादा येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराची ,भ्रष्टाचाराची चौकशी करून कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी.श्री.डी.बी.बेलदार विस्तार अधिकारी यांना पंचायत समितीतून हाकला,बाहेर काढा,भ्रष्टाचारी किडे पंचायत समितीतून साफ करा,अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा आंदोलनाचा इशारा देत तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments