Advertisement

साप शिडी खेळाचा माध्यमातून बालविवाह बंदीच्या व गरोदरपणात आरोग्य विषयक नागरिकांना आवाहन केले

आज दि:28/03/2025 रोजी सातपुड्यातील धडगाव तालुक्यामधील झापी PHC अंतर्गत येणाऱ्या सावऱ्या लेखडा गावात बालविवाह व बालविवाह नंतर होणारे परिणाम तसेच आरोग्य सेवेला अधिक बळकटी देण्यासाठी अंमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्था व jhpiego यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या AMPLI -PPHI प्रोजेक्ट च्या ( community awareness activity ) समुदाय जनजागृती कार्यक्रमातून साप शिडी खेळाचा माध्यमातून जोरदार आरोग्या विषयी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून झापी PHC मध्ये 24/7 उपस्थित राहून सेवा देणाऱ्या तसेच आपल्या समुपदेशनातून लाभार्थ्यांना आरोग्य विषयी जागृत करणाऱ्या कर्तव्यदक्ष M.O Dr.यशकुमार पाटील. व LHV चौधरी सिस्टर यांची विशेष उपस्थिती होती सोबत गावातील सरपंच रायमल पावरा. ग्रा.पं सदस्य इलापसिंग पावरा. पोलीस पाटील रोलसिंग दादा गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी. अंगणवाडी सेविका महिला आदी उपस्थित होते सोबतच jhpiego संस्थेचे डॉ. हर्षदा पवार मॅडम. महेंद्र पवार सर तसेच आधार संस्थेचे रेणू प्रसाद मॅडम. दीपक संदनशिव सर.अनिल खर्डे सर. व केअर नेवीगेटर उपस्थित होते.
                                                  अनिल खर्डे सर यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविका मांडली त्यानंतर टीमने साप शिडी खेळाचा माध्यमातून आरोग्य विषयाचे मुद्द्यावर खेळ खेळले व कार्यक्रमाला लाभलेले झापी PHC चे M.O.Dr. यश कुमार पाटील यांनी आपल्या आरोग्य केंद्रात मिळणाऱ्या सेवा तसेच योजना बाबत माहिती दिली व LHV चौधरी sister' यांनी आपली स्थानिक भाषेत ANC मातांना गरोदरपणात त गयावयाची काळजी या विषय सविस्तर माहिती दिली तसेच आशा सेविका अनिता पावरा सूमली पावरा. मिसा पावरा. रिना पावरा व अंगणवाडी सेविका बबिता पावरा यांनी आपण करीत असलेले कामाचे सेवा तसेच योजना याबाबत लोकांना माहिती दिली व बालविवाह नंतर होणारे दुष्परिणाम व उपयोजना याबाबत गावकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.
                यासाठी आपल्या धडगाव तालुक्याचे आरोग्यदूत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांतीलाल पावरा सर व आधार संस्थेचे अध्यक्षा डॉ भारती पाटील मॅडम.रेणू प्रसाद मॅडम दीपक संदनशिव सर.अनिल खर्डे सर. तसेच jhpiego चे डॉ हर्षदा पवार मॅडम. महेंद्र पवार सर. व आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर ची टीम यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचे आरोग्य जनजागृती कार्यक्रम गाव पातळीवर शाळांवर तसेच पाड्यांवर वस्त्यांवर राबवले जात आहेत.  
शेवटी कार्यक्रमाच्या समारोप दिनेश पावरा यांनी शब्दसुमानाने सर्व गावकऱ्यांचे आभार मानले यावेळी आधार संस्थेचे केअर नेव्हिगेटर मंगलसिंग शेमले. कालुसिंग पाडवी. भाईदास पावरा रविंद्र वसावे इत्यादी उपस्थित होते 
कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य: Aadhaar & jhpiego Team thanks 🙏

Post a Comment

0 Comments