ग्रामसेवकावर कारवाईची गटविकास अधिका-यांकडे मागणी
धडगांव प्रतिनिधी: धडगांव तालुक्यातील ग्रामपंचायत जुगनी येथील ग्रामसेवकाने माहिती अधिकारात ग्रामपंचायतची माहिती देण्यासाठी अर्जदाराकडून तब्बल १९ हजार रूपये ऊकळल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे.राजेश अशोक ब्राह्मणे असे या ग्रामसेवकाचे नाव आहे.अर्जदार अशोक जोमा वळवी यांनी याबाबत गटविकास अधिकारी धडगांव यांच्याकडे दिनांक २१ मार्च २०२५ रोजी एक तक्रार अर्ज दाखल केला आहे.
अशोक जोमा वळवी राहणार जुगनी यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत सन २०१६ ते सन २०२२ अखेरची ग्रामपंचायत जुगनी येथील पेसा निधी,१४ वा,१५ वा वित्त आयोगातून जुगनी या गांवात रस्ते,अंगणवाडी,कंपाऊंड यासाठी किती निधी खर्च केला ,याबाबत कामाचे स्टेटमेंट नक्कल झेरॉक्स प्रतीत मिळावी,अशी दिनांक ३० ऑगस्ट २०२२ रोजी अर्जाद्वारे मागणी केली होती.ती माहिती देण्यासाठी ग्रामसेवक जुगनी यांनी अर्जदार कडून चलनाद्वारे तब्बल १९ हजार रूपये भरून घेतले व ७ हजार प्रतीत माहिती देतो म्हणून सांगितले व फक्त ७०० पृष्ठ माहिती देऊन बाकीचे माहिती नंतर देतो म्हणून फसवले.३ वर्षे झाले तरी अर्जदारास माहिती दिली नाही. जास्तीचे पैसे भरून घेऊन अर्जदाराकडून पैसे उकडले. म्हणून अर्जदार अशोक जोमा वळवी यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगांव यांच्याकडे ग्रामसेवक राजेश अशोक ब्राम्हणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व माझे पैसे व्याजासह परत करावे,अशी मागणी केली आहे.
0 Comments