Advertisement

खडकी उपकेंद्र सिंदीकामोदपाडा येथे पथनाट्यातून बालविवाह बंदीच्या व गरोदरपणात आरोग्य विषयी चे संदेश


शहादा प्रतिनिधी:-आज दि:21/03/2025 रोजी सातपुड्यातील सिंधीकमोद पाडा या गावात बालविवाह व बालविवाह नंतर होणारे परिणाम तसेच आरोग्य सेवेला अधिक बळकटी देण्यासाठी अंमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्था व jhpiego यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या AMPLI -PPHI प्रोजेक्ट च्या ( community awareness activity ) समुदाय जनजागृती कार्यक्रमातून पथनाट्याच्या कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून झापी PHC मध्ये 24/7 उपस्थित राहून सेवा देणाऱ्या तसेच आपल्या समुपदेशनातून लाभार्थ्यांना आरोग्य विषयी जागृत करणाऱ्या कर्तव्यदक्ष dr.यशकुमार पाटील सर व dr.शमी वसावे सर यांची विशेष उपस्थिती होती

सोबत गावातील सरपंच संदिप पावरा उप सरपंच जागल्या नाईक  आशा सेविका नाशिबाई नाईक व रिना पावरा गावातील समाज कार्यकर्ते महिला आदी उपस्थित होते सोबतच जपायगो संस्था  चे डॉ. हर्षदा पवार मॅडम. महेंद्र पवार सर तसेच आधार संस्थेचे रेणू प्रसाद मॅडम. दीपक संदनशिव सर.अनिल खर्डे सर. व केअर नेवीगेटर उपस्थित होते.

  अनिल खर्डे सर यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविका मांडली त्यानंतर टीमने पथनाट्य सादर केले व कार्यक्रमाला लाभलेले खडकी उपकेंद्राचे CHO विनोद हाके .ANM खवले sister' यांनी आपल्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत मिळणाऱ्या सेवा तसेच योजना याबाबत लोकांना माहिती दिली व बालविवाह नंतर होणारे दुष्परिणाम गरोदर मातेने घ्यावयाची काळजी. व उपयोजना याबाबत गावकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.


                यासाठी आपल्या धडगाव तालुक्याचे आरोग्यदूत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांतीलाल पावरा सर व आधार संस्थेचे रेणू प्रसाद मॅडम दीपक संदनशिव सर.अनिल खर्डे सर. तसेच jhpiego चे डॉ हर्षदा पवार मॅडम. महेंद्र पवार सर. व आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर ची टीम यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचे आरोग्य जनजागृती कार्यक्रम गाव पातळीवर शाळांवर तसेच पाड्यांवर वस्त्यांवर राबवले जात आहेत.
शेवटी कार्यक्रमाच्या समारोप रेणू प्रसाद मॅडम यांनी शब्दसुमानाने सर्व गावकऱ्यांचे आभार मानले यावेळी आधार संस्थेचे केअर नेव्हिगेटर रवींद्र वसावे. मंगलसिंग शेमले. कालुसिंग पाडवी. भाईदास पावरा दिनेश पावरा इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य

Post a Comment

0 Comments