Advertisement

शेलदा गांवातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवा- बिरसा फायटर्स


जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांना निवेदन

नंदूरबार प्रतिनिधी: धडगांव तालुक्यातील येथील ५० वनदावेदारांनी २४/०१/२०२३ रोजी अध्यक्ष, जिल्हास्तरीय वनहक्क समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्याकडे अपिल केलेले अर्ज निकाली तात्काळ निकाली काढा,पाण्याची सोय करा,शाळा,अंगणवाडी व ग्रामपंचायत इमारत बांधकामास परवानगी या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून नंदूरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,भारतीय स्वाभीमान संघाचे खान्देश प्रभारी रोहीदास वळवी,भारतीय स्वाभीमान संघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,सामाजिक कार्यकर्ते डाॅक्टर सुनिल गावित,शेलदा गांवातील तुवाज्या पावरा,प्रताप पावरा,राजेंद्र पावरा,दारासिंग पावरा,दिलवरसिंग पावरा,वेल्ला पावरा,डोंग्या पावरा,छोटा पावरा,वोपारी पावरा, गिसली पावरा,मिना पावरा,सेवी पावरा,दमणी पावरा आदि २० ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.
                       शेलदा ता.धडगाव येथील श्री.प्रताप बाला पावरा सह एकूण ५० वनदावेदारांनी दिनांक २४/०१/२०२३ रोजी मा.अध्यक्ष जिल्हास्तरीय वनहक्क समिती तथा जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे अपिल अर्ज दाखल केलेले आहेत. २ वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे.तरी सदर ५० अपिल अर्जावर सुनावणी आयोजित करण्यात आलेली नाही अथवा अपिल अर्ज निकाली काढण्यात आलेले नाहीत. शेलदा येथील या वनदावेदारांकडे १९८५ पूर्वी पासून शेलदा येथे राहत असल्याचे पुरावे आहेत. शेलदा या गांवाला स्वतंत्र ग्रामपंचायत असून एकूण १००९ लोकसंख्या आहे.ग्रामपंचायतचा दर्जा असूनही वनदावेदारांना वनपट्टे न मिळाल्यामुळे गांवातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.पाण्यासाठी हॅन्डपंप वनविभाग खोदू देत नाहीत. ग्रामपंचायत इमारत बांधकाम करण्यास वनविभाग अडथडा निर्माण करते.गांवात २ जिल्हा परिषद शाळा व ३ अंगणवाडी आहेत. शाळा व अंगणवाडी इमारत वनविभाग बांधू देत नाहीत. वनदावेदारांना वनपट्टे न मिळाल्यामुळे गांवातील रहिवाशी अनेक सरकारी योजनांपासून वंचित आहेत. पाणी,वीज, शिक्षण यासारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित राहावे लागत आहे.म्हणून शेलदा येथील एकुण ५० वनदावेदारांचे अपिल अर्ज तात्काळ निकाली काढून दावेदारांना वनपट्टे देऊन न्याय द्यावा.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments