शिरूर - जिल्हा परिषद शाळा कोयाळी पुनर्वसन (शिक्रापूर) येथील शिक्षिका श्रीमती स्वीटी खरात यांना *कला साधना सामाजिक संस्था नवी मुंबई आयोजित राष्ट्रस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार 2025* तसेच *ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड नवी मुंबई आयोजित राष्ट्रस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज आदर्श शिक्षक पुरस्कार 2025* ने सन्मानित करण्यात आले.
*पद्मश्री* पुरस्कार प्राप्त *अभिनेत्री नयना आपटे* व अभिनेत्री साक्षी नाईक यांच्या हस्ते आगरी समाज मंगल कार्यालय नवी मुंबई येथे 9 मार्च रोजी सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
श्रीमती स्वीटी खरात या गेली 15 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहेत. सुरुवातीच्या काळात नाशिक येथे तळागाळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेऊन मोलाचे योगदान दिलेले आहे. याच कार्याची दखल घेऊन त्यांना या दोन्हीही पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. सध्या त्या पुणे येथील आदर्श शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर येथे कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांसाठी नवीन नवीन उपक्रम त्या नेहमी राबवत असतात.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्ना खंडेलवार नगरसेविका अनघा जाधव रामजीत गुप्ता संस्थाध्यक्ष मेघा महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वीटी खरात यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे
0 Comments