Advertisement

गरताड गावात एम एस डब्ल्यू भाग 2 च्या विद्यार्थ्यांचे क्षेत्रकार्याच्या शेवटच्या दिवस निमित्त समारोप कार्यक्रम संपन्न



गरताड प्रतिनिधी :- प्रकाश नाईक

*गरताड :-* दि. 27 मार्च 2025 रोजी समता शिक्षण संस्था पुणे, संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, ता. जि धुळे येथील, एम एस डब्ल्यू भाग 2 च्या प्रशिक्षणार्थींनी क्षेत्रकार्याच्या शेवटच्या दिवस असल्यामुळे गरताड गावात मारुती मंदिर येथे, समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 या कार्यक्रमात वर्षभरामध्ये विविध प्रकारचे कार्य करण्यात आले होते. त्याचे थोडक्यात मांडणी प्रकाश नाईक यांनी सांगितली. त्यात मोफत दंत तपासणी शिबिर, पंधरवडा स्वच्छता कार्यक्रम, आरोग्य व स्वच्छता, विधवा महिलांच्या समस्या, दिव्यांग व्यक्तींच्या समस्या, युवकांच्या समस्या, निराधार वृद्धांच्या समस्या, इतरांचा आदर महिलांच्या सन्मान, शिव्या मुक्त समाज अभियान, जय भोलेनाथ महिला बचत गट स्थापन केला, हर घर संविधान उपक्रम, शेतकऱ्यांच्या समस्या, अशा विविध प्रकारचे कार्य करण्यात आले होते. याबद्दल थोडक्यात माहिती सांगण्यात आली होती. 
 त्यानंतर गरताड गावाचे सरपंच यांचे आपलं संविधान हे पुस्तक व गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला होता.
 जय भोलेनाथ महिला बचत गट गरताड सचिव सुनिता पाटील आणि गटा मधील सदस्य महिला यांचे आपलं संविधान हे पुस्तक व गुलाबाचे फुल देऊन सत्कार केला होता. 
 गरताड गावाचे सरपंच व जय भोलेनाथ महिला बचत गटाचे सचिव व सदस्य या सर्वांनी पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 
 महिला आर्थिक विकास महामंडळ माविम धुळे येथील, लेखापाल स्नेहा सूर्यवंशी, व्यवस्थापिका दिपाली भदाणे, संयोगिनी छाया पाटील यांच्या आपलं संविधान व गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला होता. तसेच या सर्व मॅडमांनी एम एस डब्ल्यू द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. 
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुन्हेला गावित यांनी केले. तर क्षेत्रकार्याच्या कामकाजाच्या अनुभव प्रकाश नाईक यांनी सांगितले. आभार प्रदर्शन आरती पावरा हिने मानले. 
 या कार्यक्रमाचे नियोजन क्षेत्रकार्य मार्गदर्शक प्रा. डॉ. प्रमोद भुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली एम. एस. डब्ल्यू भाग दोन च्या प्रशिक्षणार्थी प्रकाश नाईक, सुन्हेला गावित, आरती पावरा, यांनी आयोजित केला होता. 
 यावेळी कार्यक्रमात गरताड गावातील सरपंच, जय भोलेनाथ महिला बचत गटातील सचिव सुनिता पाटील, व गटामधील सदस्य महिला व गावातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments