दिपाली चित्ते खून प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक नंदूरबार यांना निवेदन
नंदूरबार प्रतिनिधी: स्वर्गीय दिपाली चित्ते/ पावरा राहणार मलोनी तालुका शहादा हिचा चाकूने खून प्रकरणात गंभीर दुखापत होऊन सिंपल इन्जूरी,साधी दुखापत असा खोटा अहवाल लिहणा-या,दिपालीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सरकारी रूग्णालय शहादा येथील डाॅक्टरला सेवेतून काढून टाका व कुलकर्णी हाॅस्पीटलची मान्यता रद्द करा,या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हा शल्यचिकित्सक नंदूरबार यांना देण्यात आले आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे ,डामरखेडाचे कैलास पवार आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
दिपाली सागर चित्ते/ पावरा या आदिवासी महिलेला किरकोळ कारणावरून आरोपीत मुस्लीम हमीद कुरेशी, रिज्जू मुस्लीम कुरेशी, रूखसार राहणार सर्व अक्सा पार्क मलोनी ता.शहादा जि.नंदुरबार यांनी पोटात चाकू खुपसून जीवघेणा हल्ला केला होता,उपचार दरम्यान रूग्णालयात दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी दिपाली सागर चित्ते/पावरा हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.दिपाली सागर चित्ते /पावरा यांनी दिलेल्या जवाबानुसार आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता २०२३ कलम ११८(१),३५२,५( ३) गुन्हा दाखल करण्यात आला. आदिवासी महिलेला चाकूने गंभीर दुखापत होऊन ,रक्तस्त्राव होऊन जखमेच्या ठिकाणी ३ टाके लागूनही सरकारी रूग्णालय शहादा व कुलकर्णी रूग्णालय शहादा येथील डाॅक्टरांनी आरोपींशी मॅनेज होऊन साधी दुखापत झाल्याचा खोटा अहवाल बनवून दिला.डाॅक्टरांनीही प्रकरण दडपण्यासाठी व आरोपींना वाचविण्यासाठी खोटा अहवाल बनवून दिल्याचे दिसून येते.
सदर प्रकरणात दिपाली चित्ते/ पावरा हिच्यावर चाकूने हल्ला करणारे आरोपी जेवढे दोषी आहेत, तेवढेच दोषी आरोपींना वाचविण्यासाठी आरोपीविरुद्ध साधे कलम लावणारे पोलीस व प्रकरण दडपण्यासाठी डाॅक्टरांनी खोटा अहवाल बनवला म्हणून संबंधित डाॅक्टर सुद्धा तेवढेच दोषी आहेत.डाॅक्टरांनी योग्य उपचार करून सत्य अहवाल दिला असता तर दिपाली चित्ते / पावरा हिचा जीव वाचला असता.डाॅक्टर सुद्धा पैशांच्या लोभापोटी खोटा अहवाल बनवू लागले आहेत, म्हणून अशे डाॅक्टर रूग्णांचे जीव वाचवण्य़ाऐवजी जीव घेत आहेत,म्हणून काही डाॅक्टरांवरील जनतेचा विश्वास उडत आहे.तरी दिपाली चित्ते /पावरा चाकू हल्ला प्रकरण जलद न्यायालयात चालवण्यात यावे व दिपालीवर चाकूने जीवे घेणा हल्ला करणा-या आरोपीविरुद्ध कायदेशीर कडक कारवाई करून आरोपींना फाशी देण्यात यावी , ॲस्ट्रासिटी, विनयभंग इत्यादी अधिक गुन्हे दाखल करण्यात यावेत व संबंधित पोलिस अधिकारी व डाॅक्टर यांना तात्काळ सेवेतून काढून टाकण्यात यावे,तसेच कुलकर्णी रूग्णालय ची मान्यता रद्द करण्यात यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून करण्यात आली आहे.
0 Comments