Advertisement

केलापाणी ते शेंगलापाणी रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा- बिरसा फायटर्सची मागणी


कार्यकारी अभियंता शहादा यांना निवेदन; आंदोलनाचा इशारा

शहादा प्रतिनिधी: दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत मंजूर झालेला तोरणमाळ रस्त्याला लागून कालापाणी ते शेगलापाणी ५ किलोमीटरचा मुख्य रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा,या मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून देण्यात आले आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                           भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या ७७ वर्षानंतरही ग्रामपंचायत केला पाणी ता.धडगांव जि.नंदुरबार येथील रहिवाशी रस्ता नसल्याने अजूनही अनेक मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत.रस्ता नसल्याने रहिवाशांना गाढवावरून वस्तूंची वाहतूक करावी लागत आहे.रुग्णांना व गर्भवती महिलांना झोळीतून दवाखान्यात न्यावे लागत आहे.अवघा ५ किलोमीटरचा रस्ता झाल्यावर गावाच्या अनेक समस्यां सुटणार आहेत.या गांवात दवाखाना नाही,रस्ता नाही,पाणी नाही,वीज नाही,शाळा नाही,अंगणवाडी नाही.अनेक अत्यावश्यक मूलभूत सुविधा नाहीत. 
                दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत मंजूर झालेला तोरणमाळ रस्त्याला लागून कालापानी ते शेगलापाणी ५ किलोमीटरचा रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे.परंतू रस्त्याचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे गावक-यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.तरी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत मंजूर झालेला केलापाणी ते शेगलापाणी रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावा.हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून बांधकाम विभागाला देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments