Advertisement

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा




*धुळे प्रतिनिधी प्रकाश नाईक*

*मोराणे*:- समता शिक्षण संस्था, पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे, धुळे येथे दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सांस्कृतिक विभागाच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटक आणि अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ उपस्थित होते.
           सर्वप्रथम मा.प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांच्या हस्ते रिबीन कट करून उद्घाटन करण्यात आले होते. तसेच मा. प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ आणि उपस्थित वरिष्ट प्राध्यापक यांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मा. प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ आणि उपस्थित सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
        स्वागतानंतर प्रा. मेघावी मेश्राम यांनी प्रास्ताविकेतून वार्षिक स्नेहसंमेलना अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कला प्रकारांविषयी माहिती दिली. वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये दिनांक १८ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२५ दरम्यान रांगोळी, मेहंदी, पोस्टर,आणि काव्यवाचन या स्पर्धा घेण्यात आल्या तसेच दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी मिमिक्री स्टँड अप कॉमेडी, एकांकिका, एकपात्री नाटक, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, गायन स्पर्धा आणि नृत्य स्पर्धा इत्यादी कलाप्रकारांचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच या कालावधीत महाविद्यालयात विविध दिवस पण साजरे करण्यात आले जसे की ट्रॅडिशनल डे, बॉलिवूड डे आणि सारी अँड टाय डे. याबद्दल ही माहिती दिली. प्रास्ताविकेच्या शेवटी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये सहभागी होऊन उत्साह साजरा करावा असे आवाहन केले.
          त्यानंतर स्नेहसंमेलन उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, दैनंदिन अभ्यासा बरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न ही प्रत्येक शाळा आणि प्रत्येक महाविद्यालयीन स्तरावर होणे गरजेचे असते. त्या अनुषंगाने सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा उत्साहाचा आणि आनंदाचा क्षण असतो. वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये आपण आपल्या आयुष्यातील विविध कला कौशल्यांना प्रस्तुत करण्यासाठी उत्सुक असतो. प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक यादी अशी तयार करा की, आतापर्यंत जीवन जगत असताना आयुष्यामध्ये आपल्याला कोणी कोणी मदत केली, कुणाचे सहकार्य मिळाले आणि ज्यामुळे आज आपण या स्टेजपर्यंत पोहोचलो आपल्याला करता आली तर मला असे वाटेल की, आपण निश्चितच आपल्या जवळली व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा अनेक व्यक्तींनी आपल्याला मदत केली असेल अशा प्रत्येक व्यक्तीला आपण आठवण केली पाहिजे. शिक्षण घेत असताना आपण विविध कौशल्य आत्मसात करायला पाहिजे. जेणेकरून आपण आपले आणि आपल्या कुटुंबियांचे जीवन सुकर करू शकू. अशाप्रकारे मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना कलाप्रकार सादर करण्यासाठी शुभेच्छा दिल्यात.    
          उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. मेघावी मेश्राम यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. राजेंद्र बैसाने यांनी मानले.

Post a Comment

0 Comments