Advertisement

डॉ.वर्षा लहाडे विरोधात आदिवासी संघटनांनी आंदोलन छेडण्याने चौकशी से आदेश



नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या एकाधिकार मनमानी, दादागिरी करणे, 
कर्मचाऱ्यांकडून रजा, वार्षिक वेतनवाळ , एकस्तर भत्ते लावणे, बदली, जॉइनिंग इ. प्रशासकीय कामां करिता आर्थिक देवाण घेवाण करणे, विना निवीदा 5कोटीचे निकुष्ठ दर्जाचे पेटी साहित्य खरेदी, NRHM व तदर्थ नोकर भर्तीत निवडसमितीला डावलून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याच्या विरोधात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, बिरसा आर्मी, विश्व आदिवासी सेवा संघटना बिरसा फायटर्स, इ.विविध सामाजिक संघटना आणि जिल्हा रुग्णालय व संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, NRHM, RBSK चे सर्व अधिकारी, स्टॉप, कर्मचारी यांनी देखील काळी फिती लावून साखळी पद्धतीने तसेच कामबंद आंदोलनाला सुरवात केली होती, तसेच दिनांक-24जानेवारी 2025 पासून राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, बिरसा आर्मी, 
विश्व आदिवासी सेवा संघटना,
 बिरसा फायटर्सच्या वतीने बेमुदत धरणा आंदोलनाचा 33वा दिवस सुरु होता, या दबावामुळेच आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्य पातळी वरील चौकशी कमिटीने दिनांक-24 व 25फेब्रुवारी 2025 रोजी दोन दिवस सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे लेखी जबाब, आर्थिक देवाण- घेवाण झाल्याचे ऑनलाईन ट्रांजेक्शन चौकशी कमिटीने पुरावे घेऊन जवळ जवळ तीनशे ते चारशे अधिकारी कर्मचाऱ्यांनी जाब जबाब
लिहून दिले आहेत,
  चौकशी कमिटीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन करणाऱ्या सामाजिक व अधिकारी, कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यां सोबत आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन कमिटीच्या सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन साकारत्मक चर्चा करून आश्वस्थ केले की, कमिटीचा अहवाल हा दोन दिवसात मा, आयुक्त, सचिव सो, आरोग्य भवन, मुंबई यांच्या मार्फत मा. आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या कडे सादर करून चार ते पाच दिवसात डॉ. वर्षा लहाडे यांच्याबाबतीत लवकरात लवकर सखोल चौकशी करून बदली, निलंबीत, बडतर्फ सारखी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहेत, 
   जर कमिटीने दोन वेळा चौकशी करून देखील डॉ. वर्षा लहाडे यांच्यावर आठ दिवसाच्या आत योग्य ती कार्यवाही नाही झाल्यास सामाजिक संघटना आणि जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्रा. आ केंद्राचे अधिकारी, स्टॉप, या सर्व 
कर्मचारी संघटना कडून कामबंद आंदोलन कारण्यात येईल असे चौकशी कमिटीच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून सदर तात्पुरते आंदोलन हे स्थगित कारण्यात आले आहेत,
असे मा.रोहिदास वळवी
(राष्ट्रीय महासचिव राष्ट्रीय आदिवासी ऐकता परिषद ) पंकज वळवी (नंदुरबार जिल्हाअध्यक्ष), राकेश पाडवी ( नवापूर तालुका अध्यक्ष, बिरसा आर्मी )बिरसा फायटर राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा , डॉ. सुनील गावीत (सामाजिक कार्यकर्ते ), मालती वळवी (सामाजिक कार्यकर्त्या), जितेंद्र बागुल (राष्ट्रीय अध्यक्ष, विश्व आदिवासी सेवा संघटना), डॉ. नरेश पाडवी, डॉ. किसन पावरा ,
 डॉ. सुलोचना बागुल,डॉ. मंगलसिंग पावरा, डॉ. रंजित पावरा, डॉ. जर्मनंसींग पाडवी (नंदुरबार जिल्हाअध्यक्ष मेगमो ),  
डॉ. सुनील वळवी ( जिल्हा उपाध्यक्ष) डॉ. अजित कोठारी (जिल्हा सचिव ), डॉ. सुहास पाटील (राज्य सदस्य), डॉ. संतोष परमार (राज्य सदस्य )श्रीमती मनुष्का वळवी, (जिल्हाअध्यक्ष नर्सेस संघटना), प्रशांत मोहिते (जिल्हा सचिव), सुवार्ता सिस्टर, विनायक गावीत सर्व सामाजिक आणि अधिकारी, स्टॉप, कर्मचारी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून निर्णय घेतला आहेत,

Post a Comment

0 Comments