नंदूरबार प्रतिनिधी: नंदूरबार जिल्हाधिकारी मिताली सेठी विरोधात आदिवासी संघटना आक्रमक भूमिका घेत आहेत.जिल्हाधिकारी मिताली सेठी नंदूरबार जिल्ह्य़ात आल्यापासून आमचा एकही प्रश्न सोडवला नाही.याऊलट जिल्हाशल्यचिकित्सक डाॅक्टर वर्षा लहाडे यांनी केलेल्या आर्थिक देवाण घेवाण, भ्रष्टाचार व मनमानी कारभार व पदाच्या गैरवापर बद्दलच्या तक्रारींवर डाॅक्टर वर्षा लहाडे यांना पाठीशी घालणे,१८ दिवस जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर सुरू असणा-या आदिवासी संघटनांच्या धरणे आंदोलनाकडे कानाडोळा करणे,५ वर्षे आदिवासी वनदावेदारांच्या फाईल्स पैशांच्या अपेक्षेने दडपून ठेवणा-या श्री.हर्षल सोनार जिल्हा समन्वयक वनजमीन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्यावर कारवाई न करणे,भ्रष्ट कर्मचाऱ्यांस पाठीशी घालणे, लोकसभा व विधानसभेत मतदारांना खुलेआम पैसे वाटप करणा-या भ्रष्ट लोकांना पाठीशी घालणा-या ,लोकशाहीची हत्या करणा-या भ्रष्ट प्रांत अधिकारी शहादा सुभाष दळवी यांच्यावर कारवाई न करणे, आदिवासी संघटनांचा आवाज दडपण्यासाठी वारंवार मनाई आदेश ,जमावबंदी लागू करणे,आदिवासी संघटनांची निवेदन घेण्यास टाळाटाळ करणे,भेट नाकारणे,वारंवार मिटींगचे कारणे सांगून फक्त बुधवार व शुक्रवार रोजी दुपारनंतरच भेटण्याचे बोर्ड लावणे, निवेदनातील मागण्यांवर कार्यवाही न करणे,निवेदन नुसते फाॅरवर्ड करणे,प्रलंबित वनदाव्यांवर कार्यवाही न करणे, जिल्ह्यातील आदिवासींच्या जन्म व मृत्यू नोंद न करण्याच्या विषयावर गांभीर्यपूर्वक कारवाई न करणे,आदिवासी गांवात रस्ता अभावी बालमृत्यू,गरोदर माता मृत्यू,बाम्बुलन्स झोळीतून रोग्याला नेणे ,पाणी,वीज,रस्ता,शाळा,अंगणवाडी,दवाखाना नाही अशा गावाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे इत्यादी अनेक आरोप आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्यावर करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी प्रलंबित मागण्यांबाबत, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याविरोधातच येणा-या काळात आक्रोश मोर्चा काढणार असल्याचा इशारा देण्यात आला.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,धडगांव तालुकाध्यक्ष सुनिल तडवी ,गौतम वसावे,तळोदा तालुक्यातील वनसिंग पटले,हाना पटले इत्यादी बिरसा फायटर्स कार्यकर्ते व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे राज्य उपाध्यक्ष रोहीदास वळवी,जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी आदि उपस्थित होते.
0 Comments