Advertisement

चुलवड ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची होणार चौकशी; सरपंच व उपसरपंच शिक्षक पदावर कसे?

 नंदूरबार प्रतिनिधी: सरपंच व ग्रामसेवक ग्रामपंचायत चुलवड तालुका अक्राणी यांनी संगनमताने ग्रामपंचायत निधीचा अपहार केल्याबद्दल सखोल चौकशी करा व सरपंच व हे उपसरपंच पदावर असूनही मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्हा परिषद शाळा चूलवड येथे शिक्षक पदावर काम करून दोन्ही पदांवरचे मानधन घेऊन शासनाची फसवणूक केल्याबद्दल कारवाई करा,महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १६( ग) अन्वये सरपंच व उपसरपंच यांना अपात्र करा व ग्रामपंचायत निधीचा अपहार केल्याबद्दल सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदवा,अशी तक्रार चूलवड गावातील ग्रामस्थ सुनिल बाबाज्या तडवी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे केली आहे.या तक्रारीवरून जिल्हा परिषद नंदूरबार कडून चौकशीचे आदेश काढण्यात आले आहेत. 
                  तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की,सौ. वंदना आपसिंग पावरा सरपंच व श्री.राजेंद्र फोप-या पावरा उपसरपंच हे ग्रामपंचायत चूलवड तालुका अक्राणी जिल्हा नंदुरबार हे सरपंच व उपसरपंच पदांवर कार्यरत असताना मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्हा परिषद शाळा चूलवड येथे शासनाकडे माहिती लपवून शिक्षक पदासाठी नियमबाह्य आदेश मिळवून सरपंच व शिक्षक अशा दोन पदांवर काम करून दोन पदांचे मानधन घेऊन शासनाची फसवणूक केली आहे.
                    सुनिल बावाज्या तडवी अर्जदार यांनी दिनांक १४/०९/२०२४ रोजी जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक श्री.केशव गुलाबसिंग खर्डे ग्रामपंचायत चूलवड ता.अक्राणी यांना माहिती अधिकार अंतर्गत ग्रामपंचायत चूलवड येथील प्राप्त निधी,खर्च निधी व शिल्लक निधी ची माहिती घेण्यासाठी माहिती अधिकार अर्ज दाखल केल्यानंतर लेखी स्वरूपात माहिती देण्यास ग्रामसेवक चूलवड यांनी टाळाटाळ करीत माहिती दिली नाही व वरवर दाखवलेल्या माहितीनुसार लाखों रूपयांचा अपहार केल्यामुळे अर्जदार यांना वारंवार सरपंचचे पती व अन्य व्यक्तींमार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. अर्जदारास ३० दिवसाच्या आत माहिती न दिल्यामुळे माहिती अधिकार अधिनियम २००५ मधील कलम २०(१) नुसार २५००० रूपये दंड व कलम २०(२) अनुसार शास्ती लादण्यास पात्र आहेत. 
तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती अक्राणी यांनी दिनांक ०७/११/२०२४ रोजी प्रथम अपिलीय अर्जावर सुनावणी घेऊन ग्रामसेवक ग्रामपंचायत चुलवड यांना अर्जदारास १५ दिवसाच्या आत माहिती देण्याचे आदेश देऊनही अर्जदारास माहिती न देऊन ग्रामसेवक ग्रामपंचायत चुलवड यांनी वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केला आहे.
                  ग्रामपंचायत चुलवड येथील मासिक सभेत गावासाठी मंडप खरेदी करणे कामाचा ठराव १ वर्षापूर्वी मंजूर करूनही अद्यापही मंडप खरेदी न करून ग्रामपंचायत सभेत मंजूर केलेले ठरावातील अनेक गाव विकासकामे प्रलंबित आहेत. काही कामे फक्त कागदावरच आहेत, प्रत्यक्षात कामे करण्यात आली नाहीत. कामे केलेली आहे असे खोटे कागदोपत्री दाखवून ग्रामपंचायत निधीचा अपहार करण्यात आलेला आहे.
            सरपंच पदावर राहून सरपंचाद्वारे साहित्य पुरवठा करण्यात आले आहे. तसेच सरपंच यांनी आपले नातेसंबंध व हित पाहून अनेक कामे ही नातेवाईकांना देऊन नातेवाईकांच्या नावाने निधी खर्च केले आहे. ग्रामपंचायतचे बॅन्क स्टेटमेंट व खर्च निधी याचाही ताळमेळ बसत नाही.तसेच बराच निधी हा कोणतीही कामे न करता परस्पर सरपंच व ग्रामसेवक यांनी हडप केला आहे.ग्रामसेवक श्री.केशव गुलाबसिंग खर्डे यांना ग्रामपंचायत अधिनियम तसेच शासन निर्णय, नियम ज्ञात असतांना देखील प्रशासकीय व आर्थिक बाबींमध्ये सरपंच यांना लाभ देऊन कर्तव्यात कसूर केलेली आहे.तसेच निधी हडप करून भ्रष्टाचार केलेला आहे.

Post a Comment

0 Comments