Advertisement

बिरसा फायटर्सचा ठेकेदारांना दणका;जरलीफाटा ते बाहगाया रस्त्याची बांधकाम विभागाने दिले लेखी हमीपत्र



ठेकेदारांना नोटिसा व काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव


शहादा प्रतिनिधी : रस्त्याची बोगस कामे खपवून घेणार नाहीत व होऊ देणार नाहीत,असा इशारा बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला होता.धडगांव तालुक्यातील जरलीफाटा ते बाहगाया रस्त्याचे खडीकफण व डांबरीकरण काम निकृष्ट चालू असल्याचे बघून धडगांव तालुक्याचे बिरसा फायटर्स संघटक मुकेश पावरा यांनी रस्त्याचे काम बंद पाडत आक्रमक भूमिका घेतली होती.त्यानंतर बिरसा फायटर्स नंदूरबार शाखेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे या निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी व ठेकेदार कारवाई करण्यात यावी,असे निवेदन दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी देण्यात आले होते.त्यानंतर दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ रोजी बिरसा फायटर्स व भारत आदिवासी संविधान सेना अशा आदिवासी संघटना मिळून सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.आंदोलन दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांना सुशिलकुमार पावरा व इतर कार्यकर्त्यांनी धारेवर धरले होते व आमच्या भागात एकही बोगस काम खपवून घेणार नाहीत, असा दम भरला होता. सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
             लेखी पत्रानुसार रस्त्याचे निष्कृष्ट काम करणा-या सर्व ठेकेदारांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत .निकृष्ट कामे करणा-या ठेकेदारांची नावे काळ्या यादीत टाकण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत. ५ वर्षाच्या आत रस्ता उखडला तर ठेकेदारांकडून तात्काळ रस्ता दुरूस्तीची हमी देण्यात आली आहे.अपूर्ण रस्त्यांची कामे १५ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रस्ता अपूर्ण ठेवल्यास ठेकेदारावर दंडात्मक कारवाई पैशाच्या स्वरूपात आकारण्यात येणार आहेत. बिरसा फायटर्सच्या आक्रमक भूमिकेमुळे बोगस कामे करणा-या ठेकेदारांवर चांगलाच वचक बसला आहे व अधिकारी सुद्धा निवेदनाची दखल घेत आहेत. म्हणून आपल्या भागात रस्त्यांची निष्कृष्ट कामे होऊ देऊ नका,ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.बोगस कामे चालू असतील तर बिरसा फायटर्स संघटनेस कळवा.असे जाहीर आवाहन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी जनतेस केले आहे.

Post a Comment

0 Comments