अहिल्यानगर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उप केंद्रातील कर्मचाऱ्यांनी बायोमॅट्रिक हजेरी लावत तसेच मुख्यालयी राहुनच रुग्णसेवा द्याव्यात अन्यता करणार कारवाई - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे
प्रतिनिधी -दिपक पाचपुते:-माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक पाचपुते यांच्या मागणी नुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील वैदयकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी मुख्यालयी राहुन सेवा देणेबाबत तसेच इतर आस्थापना विषयक बाबींसंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत यापूर्वी आदेश देण्यात आले असून अजूनही जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उप केंद्रातील वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी यांना मुख्यालयास राहणे व बायोमॅट्रिक हजेरी दररोज नोंदविणे बंधनकारक केलेले असताना देखील अद्यापही काही वैद्यकीय अधिकारी हे दैनंदिन बायोमॅट्रिक हजेरी करीत नसल्याचे व मुख्यालयी राहत नसल्याचे सदयस्थितीमध्ये काही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बाहय रुग्ण तपासणी अनेकवेळा बंद असल्याबाबत व वैदयकीय अधिकारी व कर्मचारी प्रा.आ. केंद्रामध्ये उपस्थित नसल्याबाबत रुग्णाच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी येत असून सदर बाब प्रशासकीय दृष्ट्या अत्यंत गंभीर स्वरुपाची असल्याने वैदयकीय अधिकारी व कर्मचारी यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी तास वास्तव्य करुन राहावे व बायोमॅट्रीक प्रणालीद्वारे नियमित हजेरी,उपस्थिती नोंदविण्यात यावी,तसेच वैदयकीय सेवा देण्यामध्ये हयगय अगर टाळाटाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांचे पर्यवेक्षकीय कामकाजातील हलगर्जीपणा अगर वैदयकीय अधिकारी यांचे अनुपस्थितीमुळे कोणत्याही रुग्णाच्या जिवितास धोका निर्माण झाल्यास अगर तत्सम प्रकार घडल्यास संबधितांवर प्रशासकीय कारवाई समवेत कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल व चौकशी अंती दोषी आढळल्यास त्यांचे वैदयकीय नोंदणी परवाना पत्र (सनद) रदद करणेबाबत कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. मा.आयुक्त, आरोग्य सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडील सुचनेनुसार सर्व वैदयकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी हे मुख्यालयी राहत असल्याबाबतचा व राहात नसल्यास केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तसेच ता.आ.अ. व प्रा.आ. केंद्रातील बायोमॅट्रीक उपस्थिती अहवाल कर्मचारी/अधिकारी यांचे पदनिहाय त्वरीत या कार्यालयास सादर करावे. यापुढील प्रत्येक महिन्याचे वेतन देयक सादर करताना तालुका वैदयकीय अधिकारी यांचे आधारलिंक प्रणालीद्वारे दर्शविलेल्या बायोमॅट्रीक उपस्थितीप्रमाणेच वेतन अदा करावयाचे असल्याने त्याअनुषंगाने मासिक हजेरीपत्रक बिनचूकपणे सादर करावयाची दक्षता संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांनी घ्यावी. त्यामध्ये कोणताही अनाधिकृत बदल केल्याचे आढळल्यास त्यांचेवर प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. तसेच बायोमॅट्रीक अनुपस्थिती ही अनधिकृत गैरहजेरी म्हणून धरण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. जे वैदयकीय अधिकारी बायोमॅट्रीक मशिन बंद आहे अगर नादुरुस्त आहे अशा प्रकारे तांत्रिक कारणे सांगून जाणीवपूर्वक बायोमॅट्रीक हजेरी नोंदविणार नाही त्यांचेवर विनावेतनाबरोबरच शिस्तभंग विषयक कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. बायोमॅट्रीक मशिन सुस्थितीत ठेवणे ही प्रत्येक जबाबदार वैदयकीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची जबाबदारी आहे.असे आदेश अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिले आहे.
0 Comments