नंदुरबार जिल्हाचे खा.ॲड.गोवाल पाडवी यांना निवेदन देण्यात आले
शहादा प्रतिनिधी:- शहादा तालुक्यातील मलगाव येथे मालनदेवी मंदिराचे तिर्थक्षेत्र योजनेत सामाविष्ट करुन मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यात यावे अशी मागणी मलगावचे सरपंच मा.अमीत पाडवी नंदुरबार जिल्हाचे खासदार.ॲड.गोवाल पाडवी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की मलगाव येथे मालनदेवी मंदिराचे तिर्थक्षेत्र योजना अंतर्गत सामाविष्ट करावे कारणं की शहादा तालुक्यातील पुर्वेस स्थित असुन सदर गावाची लोकसंख्या 3400 गावात आहे, आणि मालनदेवी माता मंदिर येथे दरवर्षी प्रमाणे महाशिवरात्रीला या ठिकाणी यात्रा भरत असते. मालदेवी मातेच्या दर्शनासाठी आजूबाजूच्या परिसरातील भाविक भक्त या ठिकाणी दर्शन करण्यासाठी येतात.आणि मालनदेव मंदिरात भाविकांची गर्दी जवळपास 70000 ते 80000 च्या संख्येने भाविक भक्तांची गर्दी यात्रा निमित्ताने दर्शनासाठी येत असतात. म्हणुन त्या ठिकाणी येणाऱ्या 26 फेब्रुवारी 2025 रोजी यात्रा उत्सव येत असताना मालनदेवी येथे भाविक भक्तांची सुविधा पुरविणे आवश्यक आहे.
तरी सदर गावास तिर्थक्षेत्रात समाविष्ट करुन सोय सुविधा अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण आणि डांबरीकरण करण्यात यावे आणि मंदिरांच्या परिसरात सुशोभिकरण,संरक्षण भिंत,वाहनतळ,पेव्हर ब्लॉक,भक्त निवास या सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे अशी नम्र विनंती.
0 Comments