Advertisement

अखेर सुभाष दळवी उपविभागीय अधिकारी यांची नंदूरबार जिल्हय़ातून हकालपट्ट्टी; बिरसा फायटर्सच्या लढ्याला यश!



भ्रष्ट अधिकाऱ्याची एक विकेट पडली!

शहादा प्रतिनिधी: लोकशाहीची हत्या करणा-या, लोकसभा निवडणुकीत खुलेआम पैसे पाटणा-या भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालणा-या,निवडणुकीत आपल्या कर्तव्यात कसूर सोडणा-या,५०० रूपये दिल्यानंतर जातीच्या दाखल्यावर अंगठा ठेवणा-या व आदिवासी बांधवांना वनहक्कापासून वंचित ठेवून शारीरिक व मानसिक त्रास देणा-या ,आपल्या पदाचा मनमानी व गैरवापर करणा-या उपविभागीय अधिकारी शहादा सुभाष दळवी यांना सेवेतून काढून टाका, पदावरून हटवा,या मागणीसाठी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून १५ ऑगस्ट २०२४ स्वातंत्र्यदिनी व २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.लोकसभा नंदुरबारचे बिरसा फायटर्सचे अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनीही जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर अनेकदा उपोषण केले होते व वारंवार पाठपुरावा केला होता.अखेर सुभाष दळवी उपविभागीय अधिकारी शहादा यांची नंदूरबार जिल्ह्य़ाबाहेर बदली करण्यात आली आहे.त्यामुळे बिरसा फायटर्सच्या लढ्याला यश मिळाले असून एका भ्रष्ट अधिकाऱ्यांची विकेट पडली म्हणून जिल्ह्यातील आदिवासी जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
                  ५०० रूपये पैसे लाच दिल्यानंतर जातीच्या दाखल्यावर अंगठा ठेवणे(लिपीकामार्फत),लोकसभा निवडणुकीत शहादा मतदारसंघात भोंगरा व जाम येथे खुलेआम पैशे वाटणा-या भ्रष्टाचारी आरोपींना पाठीशी घालणे,पैशे वाटल्याचे पुरावे गायब करणे,प्रकरणांची चौकशी करण्यास दिरंगाई करणे व टाळाटाळ करणे,जाम येथील पैशे वाटल्याच्या विडीओची चौकशी न करणे,लोकशाहीची हत्या करणे,अक्राणी तालुक्यातील जुगनी येथील पात्र वनदावे पुन्हा अपात्र करून उपोषणकर्त्यांना शारिरीक व मानसिक त्रास देणे,वनदावेदारांना वनहक्कापासून वंचित ठेवणे,वनदावे निकाली काढण्यास दिरंगाई करणे,
राजकीय पुढा-यांचे ऐकून कामे करणे, आपल्या पदाचा मनमानी व गैरवापर करणे असे गंभीर आरोप शहाद्याचे प्रांत अधिकारी सुभाष दळवी यांच्याविरोधात करण्यात आलेले आहेत.

Post a Comment

0 Comments