डाॅ.वर्षा लहाडे चले जाव; जोरदार घोषणाबाजी
नंदूरबार प्रतिनिधी: डाॅ.वर्षा लहाडे जिल्हा शल्यचिकित्सक नंदूरबार यांच्या एकाधिकार, गैरवर्तणूक व भ्रष्टाचाराची सखोल होऊन जिल्हा बदली करा,या मागणीसाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, बिरसा फायटर्स, बिरसा आर्मी ,विश्व आदिवासी सेवा संघटना आदि आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर दिनांक २४ जानेवारी २०२५ पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे राज्य उपाध्यक्ष रोहीदास वळवी ,बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे नंदूरबार जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,उपजिल्हाध्यक्ष लालसिंग तडवी,किसन वसावे, लालसिंग पाडवी, बिरसा फायटर्सचे विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे, जितेंद्र भंडारी,बिरसा आर्मीचे नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी,धडगांव तालुकाध्यक्ष अजय वळवी, मालती वळवी इत्यादी महिला कार्यकर्त्यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.वर्षा लहाडे यांच्या आस्थापना अंतर्गत कायमस्वरूपी व कंत्राटी अधिकारी ,कर्मचारी यांच्याकडून वेतन करणे,नूतनीकरण करणे,पोस्टिंग, प्रतिनियुक्ती रद्द करणे,पदोन्नती करणे,रजा मंजूर करणे, वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठवणे,गोपनीय अहवाल, जी.पी.एफ.काढणे इत्यादी सारख्या अनेक प्रशासकीय तसेच इतर कामासाठी आर्थिक मागणी करणे.एन आर एच एम व नवीन पदभरती आणि तदर्थ पदभरती करण्यासाठी निवड समितीला डावलून एकतर्फी आर्थिक देवाण घेवाण करून भरती प्रक्रिया राबविणे.वार्षिक पेटी सप्लाय स्टेशनरी कोणतीही मागणी नसताना देखील निष्कृष्ट दर्जाची स्टेशनरी खरेदी करून ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालय येथे पुरवठा करणे.डाॅक्टर वर्षा लहाडे यांच्यावर स्त्री भ्रूण हत्यासारखा गंभीर गुन्हा दाखल असून त्यांच्यावर आय पी सी कलम ४६८,४७१,४२०,१७७,१७८,१८६ अंतर्गत गुन्हा दाखल असून त्यांना नंदूरबार सारख्या आदिवासी बहूल जिल्ह्य़ात जिल्हा शल्यचिकित्सक पदावर नियुक्ती का देण्यात आली? त्यांना तात्काळ नंदूरबार जिल्ह्य़ातून हकालपट्टी करा,अशी मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे.
डाॅ.वर्षा लहाडे यांच्या समर्थनार्थ निवेदन देणा-या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ,बहुजन समाज पार्टी नंदूरबार यांचा आदिवासी संघटनांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.भ्रष्टाचाराचे समर्थन करणा-या संघटनांत आदिवासी बांधवांनी काम करू नये,असे जाहीर आवाहन करण्यात आले.या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, भ्रष्ट अधिकारी चले जाव, वर्षा लहाडे चले जाव, वर्षा लहाडेंवर कारवाई झालीच पाहिजे ,अशा जोरदार घोषणा आंदोलन कर्त्यांनी दिल्या.डाॅ.वर्षा लहाडे जाती जातीत तेढ निर्माण करत आहेत. जोपर्यंत डाॅ.वर्षा लहाडे यांची नंदूरबार जिल्ह्य़ातून हकालपट्टी होत नाही,तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहोत,अशी आक्रमक भूमिका आदिवासी संघटनांनी घेतली आहे.
0 Comments