नंदूरबार प्रतिनिधी: भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागण्यांसाठी बिरसा फायटर्सचे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर ठिय्या आंदोलन होणार आहे.आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे नंदुरबार यांना देण्यात आले आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे ,डामरखेडा शाखेचे कैलास पवार आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकशाहीची हत्या करणा-या,लोकसभा व विधानसभा निवडणुकीत खुलेआम पैसे वाटण्यास लावणा-या, पैसे वाटणा-यांचे समर्थन करणा-या,पैसे वाटणा-या भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालणा-या,निवडणुकीत आपल्या कर्तव्यात कसूर करणा-या ,पैसे दिल्यानंतर जातीच्या दाखल्यावर अंगठा ठेवणा-या व पात्र वनदावे अपात्र करून आदिवासी बांधवांना वनहक्कापासून वंचित ठेवून शारीरिक व मानसिक त्रास देणा-या ,आपल्या पदाचा मनमानी व गैरवापर करणा-या उपविभागीय अधिकारी शहादा श्री.सुभाष दळवी यांना सेवेतून काढून टाका, पदावरून तात्काळ हटवा.नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सक डाॅक्टर.वर्षा लहाडे यांची जिल्हा बदली करा व त्यांनी केलेल्या आर्थिक देवाण घेवाण/ भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी.बिलीचापडा ता.तळोदा येथील २१ मंजूर वनदाव्यांच्या फाईल्स पैशांच्या अपेक्षेने तब्बल ५ वर्षे दडपून ठेवणा-या श्री.हर्षल सोनार जिल्हा समन्वयक वनजमीन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांना सेवेतून काढा.
स्वर्गीय दिपाली चित्ते यांचा चाकूने खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करा व दिपालीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ,चाकूने गंभीर दुखापत झालेली असतानाही पोलीस ठाणे शहादा येथील संबंधित पोलिसांनी गंभीर गुन्हा नोंदवला नाही,त्या संबंधित पोलीस अधिकारी व चाकूने गंभीर दुखापत झालेली असतानाही सिंपल इन्जूरी, साधी दुखापत असा खोटा अहवाल लिहणा-या सरकारी रूग्णालय शहादा येथील डाॅक्टर यांनाही सहआरोपी करा व सेवेतून काढून टाका.कुलकर्णी रूग्णालय शहादा यांची मान्यता रद्द करा.बिलीचापडा ता.तळोदा येथील आदिवासी बांधवांची जन्म मृत्यू नोंद करा.जन्म मृत्यूची नोंद न करणा-या ग्रामसेवकाला सेवेतून काढा.गांवात शाळा,अंगणवाडी,पाणी,रस्ता,विजेची सोय इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध करून द्या. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व पोलीस पाटील हे शिक्षक, आरोग्यसेवक, अंगणसेविका इत्यादी दोन पदांवर काम करून दोन पदांचे पगार/मानधन घेऊन शासनाची फसवणूक करणा-यांवर कडक कारवाई करा. शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थांच्या जेवणासाठीची अन्नपूर्णा सेंट्रल किचन योजना बंद करा. जिल्ह्य़ातील प्रलंबित वनदावे निकाली काढा.इत्यादी विविध मागण्यांसाठी बिरसा फायटर्स संघटनेकडून हे ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार आहे.
0 Comments