Advertisement

आदिवासी महासंमेलनात बिरसा फायटर्सच्या कामाचे कौतुक!



३ दिवस भोजन विभागात केली स्वयंसेवा

नंदूरबार प्रतिनिधी: ३२ वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन पानखेडा तालुका साक्री जिल्हा धुळे येथे दिनांक १३,१४,१५ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.या संमेलनात देश विदेशातील लाखों आदिवासी बांधव सहभागी झाले.संमेलनात आलेल्या सर्व बांधवांना १३,१४,१५ जानेवारी रोजी सलग ३ दिवस सकाळ, संध्याकाळ, रात्री असे २४ तास आयोजकांकडून जेवणाची सोय केली जाते. बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य या आदिवासी सामाजिक संघटनेने स्वयंसेवक म्हणून आलेल्या सर्व बांधवांना भोजन विभागात सलग ३ दिवस जेवण वाढण्याचे काम केले.या कामात बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,शिरपूर तालुकाध्यक्ष चांदसूर्या येथील बिरसा फायटर्स टिम, तळोदा तालुक्यातील बिलीचापडा येथील बिरसा फायटर्स टिम,शहादा तालुक्यातील शहाणा,वडगांव, कोळपांढरी येथील बिरसा फायटर्स टिम व मध्यप्रदेश मधील बंधारा बुजूर्ग येथील बिरसा फायटर्स टिम यांनी स्वयंसेवा दिली.बिरसा फायटर्सच्या या कामाबद्दल आदिवासी एकता महासंमेलनाचे आयोजक आदिवासी एकता परिषद तर्फे मंचवर बिरसा फायटर्स टिमच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले व मंचवर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना आमंत्रित करून सन्मान करण्यात आला.
          बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी यांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची वेशभूषा महासंमेलनात आकर्षण ठरली.बिरसा फायटर्स टिमचा विशेष पोशाख व टिम वर्क पाहून अनेक मान्यवरांनी बिरसा फायटर्स टिम सोबत फोटो काढून कौतुक केले.

Post a Comment

0 Comments