शहादा प्रतिनिधी: पवित्र प्रणालीद्वारे २०२२ मध्ये शिक्षक भरती फक्त एका टप्प्यात झाली, शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई व महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त पुणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा जिल्हा नंदूरबार मार्फत पाठविण्यात आले आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे,डामरखेडाचे आकाश भील आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक भरतीत २१,६७८ रिक्त पदांची जाहीरात काढण्यात आली होती.त्यापैकी पहिल्या टप्प्यात फक्त १३००० पदे भरण्यात आली व ८६७८ पदे रिक्त आहेत.त्यापैकी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती उमेदवारांची रिक्त पदे आहेत. राखीव प्रवर्गातील रिक्त पदे अधिक आहेत. जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगरपरिषद, खाजगी शैक्षणिक संस्थांमधील अनेक शाळांतील शिक्षक पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.म्हणून पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू करण्यात यावा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.
0 Comments