अजंग येथे सिध्दीविनायक गणपती मंदिर परिसरात रस्त्यावरच रांगोळी काढली:-सुभाष दादा माळी
धुळे प्रतिनिधी :-अजंग गावात अहिल्याबाई होळकरांनी.उजव्या सोंडेचे छोटेसे सिद्धीविनायक गणपती मंदिर बांधले होते. त्या मंदिराचे रुपांतर मोठ्या स्वरूपात व्हावे अशी संकल्पना मांझ गाव माझं शिवार ग्रुप ॲडमीन सुभाष दादा यांनी व्हाॅटसप द्वारे मांडली तेव्हा माझं गाव माझं शिवार ग्रुप सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. आणि लोक सहभागातून आज सिद्धीविनायक गणपती मंदिर उभे राहिले परंतु गावातील काही ठराविक महिला या अजंग गाव १००% टक्के हागणदारीमुक्त झालेले. असतांनाही या महिला गणपती मंदिर परिसरात शौचास बसत असतात म्हणून सुभाष दादांनी घरातील महिला या उघड्यावर आणि गणपती मंदिर परिसरात शौचास येणार नाही.म्हणून बर्याच प्रकारे विनंत्या करूनही त्या महिला उघड्यावर बसतात.परंतु आज तर माझं गाव माझं शिवार ग्रुप ॲडमीन सुभाष दादा आणि त्यांच्या पत्नी सौ.पुनमताई यांनी आज ३१ डिसेंबरला रात्री चक्क ज्या महिला त्या रोडावर शौचास उघड्यावर बसतात ती जागा/रोडच झाडून काढला आणि संडारांगोडी केली,आणि नवीन इंग्रजी वर्षाच्या त्या महिलांसाठी शुभेच्छा टाकल्या. जेणेकरून त्या महिला रोडावर रांगोळी काढलेली पाहून तरी शौचास बसणार नाही, गणपती मंदिर परिसर सुशोभित करण्यात जो काही प्रयत्न होत आहे. त्याला गावातील महिलांनीही प्रतिसाद द्यावा जेणेकरून मंदिर परिसरात घाण होणार नाही म्हणून गावातील पुरुष,महिला यांनीही पुढाकार घ्यावा/प्रयत्न करावा..असा आवाहन माझं गाव माझं शिवार या व्हॉट्सॲप ग्रुपचे अडमिन सुभाष दादा माळी यांनी केले आहे,
0 Comments