Advertisement

सुभाष दळवी यांना पदावरून हटविण्याची मागणी; आदिवासी संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या



नंदूरबार प्रतिनिधी: लोकसभा व विधानसभा निवडणूकीत खुलेआम पैसे वाटणा-यांना पाठीशी घालणा-या,पैसे वाटण्यास लावणा-या,लोकशाहीची हत्या करणा-या,५०० रूपये पैसे दिल्यानंतर जातीच्या दाखल्यावर अंगठा ठेवणा-या,मंजूर वनदावे नामंजूर करून आदिवासी वनदावेदारांना शारिरीक व मानसिक त्रास देणा-या उपविभागीय अधिकारी शहादा सुभाष दळवी यांना सेवेतून काढा,तळोदा तालुक्यातील बिलीचापडा येथील ५ वर्षापूर्वी मंजूर केलेल्या वनदाव्याचे प्रमाणपत्रे तात्काळ द्या,शहादा तालुक्यातील १५ गांवातील प्रलंबित वनदावे तात्काळ निकाली काढा,अक्राणी तालुक्यातील जुगनी येथील प्रलंबित वनदावे निकाली काढा,वनदावे फाईल्स लपविणा-या हर्षल सोनार जिल्हा समन्वयक वनजमीन विभाग जिल्हाधिकारी नंदुरबार यांना सेवेतून काढा, या मागण्यांसाठी बिरसा फायटर्स जिल्हा नंदूरबार व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद जिल्हा नंदूरबार तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
        या भ्रष्ट अधिका-यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय, भ्रष्ट अधिकारी सुभाष दळवी यांना नोकरीतून काढा, वनदावे निकाली काढा, वनदाव्यांचे फाईल्स दडपणा-या हर्षल सोनार याला नोकरीतून काढा, ,जंगल जमीन कुणीन से ,आमरी से,जल जंगल जमीन की रक्षा कौन करेगा,हम करेंगे अशा जोरदार घोषणा यावेळी आंदोलन कर्त्यांनी दिल्या.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे राज्य उपाध्यक्ष रोहीदास वळवी, बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, बिरसा फायटर्सचे जिल्हाध्यक्ष हिरामण खर्डे, विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे बिरसा फायटर्स, जिल्हा कार्याध्यक्ष डोंगरसिंग पावरा बिरसा फायटर्स, आकाश माळीच, एकनाथ भील, वनसिंग पटले,रमेश पटले राजेंद्र पावरा आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments