Advertisement

उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार आक्रमक; २३ डिसेंबरला आंदोलन


पैसे वाटणा-यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप;जातीच्या दाखल्यासाठी ५०० रूपये

नंदूरबार प्रतिनिधी: लोकसभा व विधानसभा निवडणुकीत खुलेआम पैसे वाटण्यास लावणा-या, पैसे वाटणा-यांचे समर्थन करणा-या,पैसे वाटणा-या भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालणा-या,निवडणुकीत आपल्या कर्तव्यात कसूर करणा-या ,लोकशाहीची हत्या करणा-या ,पैसे दिल्यानंतर जातीच्या दाखल्यावर अंगठा ठेवणा-या व आदिवासी बांधवांना वनहक्कापासून वंचित ठेवून शारीरिक व मानसिक त्रास देणा-या ,आपल्या पदाचा मनमानी व  गैरवापर करणा-या उपविभागीय अधिकारी शहादा श्री.सुभाष दळवी यांना सेवेतून काढून टाका,पदावरून हटवा या मागणीसाठी नंदूरबार जिल्ह्य़ातील अपक्ष उमेदवार आक्रमक झाले आहेत. तसेच तळोदा तालुक्यातील बिलीचापडा,अक्राणी तालुक्यातील जुगनी व शहादा तालुक्यातील १५ गांवातील प्रलंबित वनदावे तात्काळ निकाली काढा,या मागण्यांसाठी बिरसा फायटर्स व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद संघटनांकडून दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर आंदोलन होणार आहे.यावेळी अपक्ष उमेदवार अक्कलकुवा मतदारसंघ सुशिलकुमार पावरा,अपक्ष उमेदवार नंदुरबार मतदारसंघ रोहीदास वळवी ,अपक्ष उमेदवार शहादा  गोपाल भंडारी, अपक्ष उमेदवार नंदुरबार मतदारसंघ मालती वळवी, अपक्ष उमेदवार अक्कलकुवा मतदारसंघ सा-या पाडवी,बिरसा फायटर्स राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,बिरसा फायटर्स विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे, जिल्हाध्यक्ष पंकज वळवी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद ,राकेश मोरे बिरसा फायटर्सआदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                    अक्राणी तालुक्यातील जुगनी येथील वनदावेदार ५ दिवस  उपविभागीय अधिकारी कार्यालय शहादा समोर आमरण उपोषणास बसले होते.म्हणून वनदावेदारांचे बैठकीत पात्र केलेले ७ वनदावे आकसापोटी उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांनी जाणीवपूर्वक अपात्र करून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे पाठवले आहेत.
                  ५०० रूपये पैसे लिपीकामार्फत लाच दिल्यानंतर   जातीच्या दाखल्यावर अंगठा ठेवणे,लोकसभा निवडणुकीत शहादा मतदारसंघात भोंगरा व जाम येथे खुलेआम पैशे वाटणा-या भ्रष्टाचारी आरोपींना पाठीशी घालणे,पैशे वाटल्याचे पुरावे  गायब करणे,प्रकरणांची चौकशी करण्यास दिरंगाई करणे व टाळाटाळ करणे,जाम येथील पैशे वाटल्याच्या विडीओची चौकशी न करणे,
विधानसभा निवडणूकीत शहादा तालुक्यातील दुधखेडा व वडगांव या गांवात खुलेआम पैसे वाटणा-यांना वाचविण्यासाठी चौकशी न करता मतदारसंघात पैसे वाटलेच गेले नाहीत, असा खोटा अहवाल बनवून तक्रार परस्पर व मनाने निकाली काढणे,लोकशाहीची हत्या करणे,पात्र वनदावे पुन्हा अपात्र करून उपोषणकर्त्यांना शारिरीक व मानसिक त्रास देणे,वनदावेदारांना वनहक्कापासून वंचित ठेवणे,वनदावे निकाली काढण्यास दिरंगाई करणे,
राजकीय पुढा-यांचे ऐकून कामे करणे, आपल्या पदाचा मनमानी व गैरवापर करणे असे गंभीर आरोप शहाद्याचे प्रांत अधिकारी सुभाष दळवी यांच्याविरोधात करण्यात आलेले आहे

Post a Comment

0 Comments