शहादा प्रतिनिधी: शासकीय आदिवासी मुलांचे वस्तीगृह शहादा येथे बिरसा फायटर्स संघटनेकडून स्वच्छ व व्यसनमुक्त विद्यार्थी अभियान अंतर्गत दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.त्यानंतर वस्तीगृहातील गृहपाल व विद्यार्थ्यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर स्वच्छतेची प्रतिज्ञा सामूहिक रित्या घेण्यात आली.विद्यार्थांनी आपल्या वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सामूहिक स्वच्छता सुद्धा ठेवली पाहिजे.जिथे स्वच्छता असते तिथे आरोग्य वसते,म्हणून विद्यार्थांनी आपले वस्तीगृह, शाळा,काॅलेज, घर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे,असे चांगल्या सवयी व स्वच्छतेचे महत्त्व या विषयावर सुशिलकुमार पावरा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी केले.शालेय विद्यार्थांना हल्ली गुटखा खायचे वाईट व्यसन लागले आहे.काही युवक हे दारूच्या आहारी जातात. या वाईट व्यसनांमुळे विद्यार्थी हा आपल्या आई वडिलांचा पैसा वाया घालवतात व आपले आयुष्य बरबाद करतात. म्हणून शालेय जीवनात विद्यार्थांना फक्त अभ्यासाचे व्यसन असावे.चांगली चांगली पुस्तके वाचावीत, आपले ज्ञान वाढवावे व आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करावे,असे व्यसनमुक्तीपर मार्गदर्शन करण तडवी शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ता यांनी केले.
विद्यार्थांनी चांगल्या आरोग्यासाठी नियमितपणे व्यायाम करावा.गुटखा,तंबाखूजन्य पदार्थ, दारू यापासून दूर राहावे.दिवस रात्र अभ्यास करून नोकरीला लागावे.विद्यार्थांचे भविष्य घडविण्यासाठीच मी लोणखेडा येथे विद्याश्रम अकॅडमी सुरू केली आहे.त्याचा विद्यार्थांनी लाभ घ्यावा व आपले भविष्य उज्वल करावे,असे आरोग्य व शिक्षणाचे महत्त्व या विषयावर दिनेश पावरा संस्थापक विद्याश्रम अकॅडमी लोणखेडा यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थी जीवनात विद्यार्थांची एकता खूप महत्त्वाची आहे,म्हणून विद्यार्थांनी संघटित राहावे,अशा शब्दांत तुकाराम पावरा विद्यार्थी लीडर यांनी विद्यार्थी परिषद संकल्पना विद्यार्थांना समजावून सांगितली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वस्तीगृहाचे गृहपाल आशीष भोहाटे व आभार प्रदर्शन गृहपाल रवि देसाई यांनी केले.संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन गृहपाल अविनाश मोरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी वस्तीगृहातील सर्व कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केले व विद्यार्थांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
0 Comments