Advertisement

डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना व संविधानाचा अवमान करणा-यांवर कठोर कारवाई करा- बिरसा फायटर्सची मागणी



 शहादा प्रतिनिधी: परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे व संविधानाचे अवमान करण्यावर कठोर कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा जिल्हा यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                परभणी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची व संविधानाची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे व जाती जातीत तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे.या घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो.समाजात द्वेष पसरविणा-या अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करून शिक्षा झाली पाहिजे.तसेच अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना वाचविण्यासाठी काही सत्ताधारी लोकप्रतिनिधी मदत करतात. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना व संविधानाचा अवमान समस्त आदिवासी व आंबेडकरी जनता तसेच संविधानावर प्रेम करणारे नागरिक कधीच खपवून घेणार नाहीत. कट कारस्थान रचून जशी अजमेरला दंगल भडकवली तशीच दंगल या समाजकंटकांना महाराष्ट्रात भडकवायची आहे.तसेच दलितांच्या अटकेची आणि दलित वस्तीवर सुरू असलेला कॉम्बिंग आपरेशन तात्काळ थांबावावे.तसेच दलित बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत. तरी परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना व संविधानाचा अवमान करणा-यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा सरकारला बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments