वडगांव व दुधखेडा गांवात खुलेआम पैसे वाटप केल्याची तक्रार दाखल
शहादा प्रतिनिधी: शहादा विधानसभा मतदारसंघात शहादा तालुक्यातील दुधखेडा व वडगांव या गांवात मतदारांना खुलेआम पैसे वाटणा-यांची सखोल चौकशी करून कायदेशीर कडक कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी तथा अपक्ष उमेदवार शहादा विधानसभा मतदारसंघ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी शहादा विधानसभा मतदारसंघ यांच्याकडे एका तक्रारीद्भारे केली आहे.यावेळी बिरसा फाइटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
शहादा विधानसभा मतदारसंघात निवडणूक मतदान कार्यक्रमाच्या दरम्यान व दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ रोजी शहादा तालुक्यातील दुधखेडा व वडगांव या गांवात भाजप पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी मतदारांना खुलेआम पैसे वाटप करीत असल्याचे विडीओ सोशल मिडीयावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वायरल झाले आहेत.भाजप पार्टीच्या उमेदवाराला मतदान करावे,म्हणून या व्यक्तींकडून मतदारांना पैसे वाटप करण्यात आले आहे.या व्यक्तींकडून मतदारांना पैसे वाटून मतदारांना आमीश दाखवून पैशांची लाच देण्याचा गंभीर प्रकार घडला आहे.लोकशाहीला काळीमा फासणारा हा प्रकार दुधखेडा व वडगांव या गांवात घडला आहे.पैसे देऊन मतदान करायला लावून अशी लोक लोकशाहीची हत्या करीत आहेत. मतदारांना कोणत्याही प्रकारची लाच देणे,पैसे देणे,आमीश दाखवणे,धमकावणे हा गुन्हा आहे.पैसे वाटून मते विकत घेतले गेले आहेत, त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य अपक्ष उमेदवारांच्या निकालावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.
तरी सदर पैसे वाटप विडीओअंची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींवर गुन्हा नोंद करून तात्काळ अटक करण्यात यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.
0 Comments