करोडपती विरूद्ध गरीब उमेदवार, कोण जिंकणार?
धडगांव प्रतिनिधी: निवडणूक आयोग यांच्या अधिकृत संकेतस्थळावर अक्कलकुवा मतदारसंघातील एकूण ७ उमेदवारांची आर्थिक स्थिती तपासण्यात आली आहे.यात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान विधानपरिषद आमदार तथा महायुतीचे उमेदवार आमशा पाडवी यांच्या स्वतःकडे साडे पाच कोटी रूपये व कुटुंबातील व्यक्तींची मिळून एकूण साडे आठ कोटी संपत्ती दाखविण्यात आली आहे.त्यानंतर काँग्रेस चे ३५ वर्षांपासूनचे आमदार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार के.सी.पाडवी यांच्या स्वतःकडे ५ कोटी रूपये व कुटुंबातील व्यक्तींची मिळून एकूण ८ कोटी रूपये संपत्ती दाखविण्यात आली आहे. भाजपच्या माजी खासदार तथा अपक्ष उमेदवार हिना गावित यांची स्वतःची संपत्ती ५ कोटी पेक्षा अधिक संपत्ती दाखविण्यात आली असून त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या संपत्तीची माहिती दिलेली नाही. भाजप पक्षाचा राजीनामा देणारे काँग्रेस पक्षाचे माजी क्रीडा मंत्री तथा भारत आदिवासी पार्टीचे उमेदवार पद्माकर वळवी यांची स्वतःची अडीच कोटी संपत्ती व कुटुंबाची मिळून ३ कोटी रूपये दाखविण्यात आली आहे.त्यांनंतर काँग्रेस पक्षाची बंडखोरी करणारे पाचवे अपक्ष उमेदवार तथा माजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जेलसिंग पावरा यांची स्वतःची संपत्ती २ कोटी दाखविण्यात आली आहे.सहावे उमेदवार सा-या पाडवी व सातवे उमेदवार सुशिलकुमार पावरा हे संपत्तीच्या बाबतीत गरीब उमेदवार दाखविण्यात आले आहेत.
शिवसेनेचे उमेदवार आमशा पाडवी,काँग्रेसचे उमेदवार के सी पाडवी,भारत आदिवासी पार्टीचे उमेदवार पद्माकर वळवी,अपक्ष उमेदवार हिना गावित व अपक्ष उमेदवार जेलसिंग पावरा हे करोड पती उमेदवारांच्या गणतीत आहेत, तर अपक्ष उमेदवार सा-या पाडवी व सुशिलकुमार पावरा हे गरीब उमेदवारांच्या गणतीत आहेत. त्यामुळे अक्कलकुवा मतदारसंघातील जनता करोडपती उमेदवाराला आमदार म्हणून निवडून देतात की गरीब उमेदवारांना आमदार म्हणून निवडून देतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहेत.
0 Comments