Advertisement

पैसे वाटणारे उमेदवारच निवडणूक जिंकणार; प्रामाणिक उमेदवार हारणार- सुशिलकुमार पावरा

एकूच चाले पैसा चाले!

धडगांव प्रतिनिधी: अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात निवडणूकीत एकूच चाले पैसा चाले.पैसे वाटणारे उमेदवार निवडून येणार आहेत, पैसे न वाटणारे उमेदवार हारणार आहेत, असा अंदाज आहे.निवडणूक प्रचारात आमशा दादा ददमो चाले हे,हिना गावित ददमो चाले हे,पद्माकर दादा ददमो चाले हे,के सी पाडवी ददमो चाले हे,अशी भारी भारी गाणी बनवून हे उमेदवार प्रचार करीत होते.परंतु मतदानाच्या आदल्या दिवशी काही उमेदवारांच्या दलालांनी एक मतासाठी १०००,१५००,२००० रूपये वाटले.करोडो, अब्जावधी पैसे वाटले.हेच पैसे यांनी विकास कामासाठी वापरले असते तर अशी पैसे वाटायची वेळ यांच्यावर आली नसती.बिना प्रचाराचे जनतेने यांना निवडून दिले असते.
     भ्रष्ट उमेदवार निवडून आला तर तो कधीच त्या भागाचा विकास करणार नाही.कारण तो अगोदर त्यांनी वाटलेले पैसे वसूल करेल. पैसे घेऊन मतदान केले तर तुम्ही निवडलेल्या उमेदवाराला विकासाबद्दल बोलू शकणार नाहीत, कारण पैसे घेऊन तुम्ही त्याचे गुलाम बनता.आमच्यासारखा प्रामाणिक उमेदवार,मतदार बिनधास्त बोलू शकतो,कारण आम्ही कोणाचे गुलाम नाहीत. 
        सगळेच मतदार पैशांवर मतदान करतात असे नाही,तर काही मतदार हे प्रामाणिक मतदान करतात. मागील लोकसभा निवडणुकीत मला ९ हजारच्या आसपास मते मिळाली ती फक्त प्रामाणिक मते होती,बिना पैशांची मते होती.त्याचा मला अभिमान आहे.त्याच पाश्र्वभूमीवर मी विधानसभा निवडणुक लढवली.मला माझ्या प्रामाणिक मतदारांची संख्या दाखवायची आहे.मला पैसे वाटणा-यांनाच्या विरोधात लढायचे आहे,पैसे वाटणे प्रथा कायमची बंद करायची आहे.
         मला या निवडणूकीत खूप काही शिकायला मिळाले,अनुभव आले.माझा मामा बोलला,सुशील तू पैसे वाटप नाही,तू निवडणार नाही.पैसे वाटल्यावरच निवडणूक जिंकता येते, अशी मानसिकता काही लोकांत तयार झालेली आहे.
              एका दारूच्या बाटलीसाठी पैसे द्या,एक क्वार्टर प्यायला पैसे द्या,असे बोलणारे काही लोकही मला भेटले.उमेदवार निवडणूकीत उभा आहे,म्हणजे तो पैसेवाला आहे.तो पैसे वाटणार आहे.अशी लोक अपेक्षा ठेवतात. 
           काही लोक माझ्याकडेही पैशाच्या अपेक्षेने आले.त्यातला एक व्यक्ती मला बोलला,सर तुमच्याकडे रात्री गर्दी का नाही.तुम्ही एकटेच का? मी बोललो. पैसे वाटणा-यांकडे गर्दी असते.मी तर कुणालाही पैसे देत नाही.उलट पैसे वाटणा-यांविरोधात कामे करतो. त्यामुळे माझ्याकडे गर्दी नाही.पैशांची अपेक्षा ठेवणा-यांना मी हाकलून दिले.
         ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनीच राजकारणात यावे,निवडणूक लढवावी,अशी भ्रष्ट व्यवस्था निर्माण करून ठेवली.त्यामुळे लोक प्रत्येक उमेदवारांकडून पैशांची अपेक्षा ठेवतात. ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. १०००,२००० रूपये वाटणारे उमेदवार निवडून येतील, परंतू मताचे महत्त्व समजल्यानंतर एक दिवस प्रामाणिक उमेदवारही मतदार निवडून देतील,या आशेने आमची पुढील वाटचाल सुरू आहे,अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments