धडगांव प्रतिनिधी:धडगांव ते मोलगी मुख्य रस्ता,धडगांव ते चुलवड, कालीबेल,वाया अक्कलकुवा रस्ता,बिजरी ते काकरपाटी रस्ता, धडगांव ते बिलगाव, साव-यादिगर वाया तोरणमाळ रस्ता,धडगांव ते केला वाया असली रस्ता,धडगांव ते तिनसमाळ रस्ता,गोरक्षनाथ मंदीर तोरणमाळ सनसेट पाॅईंट ते सिद्दीदिगर रस्ता, धडगांव ते राडीकलम चिप्पल रस्ता,धडगांव ते चांदसैली तळोदा या रस्त्यांचे तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करावे,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून तहसीलदार धडगांव व अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धडगांव यांच्याकडे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,धडगांव तालुकाध्यक्ष सुनिल तडवी,विजय पावरा,किशोर पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते. या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.हे रस्ते अत्यंत खड्डेमय व धोकादायक झाले असून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
सदर रस्ते धडगांव ते शहादा,धडगांव ते तळोदा,धडगांव ते अक्कलकुवा अशा तीन तालुक्यांना जोडणारे एकमेव मार्ग असल्याकारणाने वाहनांची मोठी वर्दळ असते.या रस्त्यावरून कायमच्याच एस टी महामंडळाच्या बस ये जा करतात. ठेकेदार व बांधकाम विभागाने केलेल्या भ्रष्टाचारामुळे या रस्त्याचे बारा वाजले आहेत.रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी रस्त्यांची भयानक अवस्था झाली आहे.रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांमध्ये व प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे.रस्त्यावर ५ फूट पेक्षा अधिक खोल खड्डे झाले आहेत. या रस्त्यावरून गरोदर महिला,वयस्कर व आजारी नागरिकांना प्रवास नको झाले असून प्रवाशी हैराण झाले आहेत. वाहन चालवतांना खड्डे चुकवताना प्रवाशांचा अपघात होत असून दुखापत होत आहे. या रस्त्यावरून प्रवास करतांना प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतात म्हणून तातडीने हे रस्ते खडीकरण व डांबरीकरण करावेत,अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आलेला आहे.
0 Comments