Advertisement

ठेकेदार हेमलता शितोळे-पाटील यांना काळ्या यादीत टाका,अन्यथा रास्ता रोको आंदोलन- बिरसा फायटर्स आक्रमक



 दरा फाटा ते म्हसावद रस्ता ४ महिन्यातच उखळला;५ फूट खड्डे

शहादा प्रतिनिधी: शहादा ते धडगांव मुख्य रस्त्यावरील दरा फाटा ते म्हसावद रस्त्याचे निष्कृष्ट काम करणा-या ठेकेदार हेमलता शितोळे-पाटील यांना काळ्या यादीत टाका व रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करा,या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे,दारासिंग वळवी,एकनाथ भील आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                        शहादा ते धडगांव या मुख्य रस्त्यावरील दरा फाटा ते म्हसावद या रस्त्याचे ४- ५ महिन्यांपूर्वी सौ.हेमलता शितोळे-पाटील या ठेकेदारामार्फत काम करण्यात आले होते. ६ महिनेही झाले नाहीत, या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. हा रस्ता अत्यंत खड्डेमय, धोकादायक झाला आहे.२- ३ महिन्यांतच रस्ता उखडत असेल तर किती निष्कृष्ट काम संबंधित ठेकेदाराने केले असेल याची चौकशी होणे आवश्यक आहे.
                     सदर रस्ता हा धडगांव ते शहादा या दोन तालुक्यांना जोडणारा एकमेव मार्ग असल्याकारणाने वाहनांची मोठी वर्दळ असते.या रस्त्यावरून कायमच्याच एस टी महामंडळाच्या बस ये जा करतात. ठेकेदार व बांधकाम विभागाने केलेल्या भ्रष्टाचारामुळे या रस्त्याचे बारा वाजले आहेत.रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी रस्त्यांची भयानक अवस्था झाली आहे.या रस्त्याचे काम सौ.हेमलता शितोळे पाटील या ठेकेदारास देण्यात आले होते.त्यांनी रस्त्याचे ओबडधोबड काम करून मोठा भ्रष्टाचार केलेला आहे.रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांमध्ये व प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे.रस्त्यावर ५ फूट पेक्षा अधिक खोल खड्डे झाले आहेत. या रस्त्यावरून गरोदर महिला,वयस्कर व आजारी नागरिकांना प्रवास नको झाले असून प्रवाशी हैराण झाले आहेत. वाहन चालवतांना खड्डे चुकवताना प्रवाशांचा अपघात होत असून दुखापत होत आहे. या रस्त्यावरून प्रवास करतांना प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतात म्हणून तातडीने हा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करावा. व ठेकेदार सौ.हेमलता शितोळे पाटील यांना ठेकेदारांच्या काळ्या यादीत नाव समाविष्ट करावे ,जेणेकरून पुढील कोणतेही रस्त्याचे काम त्यांना देण्यात येऊ नयेत,अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments