धडगांव प्रतिनिधी : अक्कलकुवा -अक्राणी मतदारसंघाचे बिरसा फायटर्सचे अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा हे स्वतःच्या MH 08 Z 7637 या निवडणूक प्रचारासाठी परवाना असलेल्या गाडीतून अक्राणी तालुक्यातील साव-यादिगर भागात प्रचार करीत असतांना रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे त्यांच्या गाडीचे पुढचे व मागचे चारही टायर फुटले,त्यामुळे गाडीत असणारे अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा व त्यांच्यासोबत असणारे चार कार्यकर्ते बालबाल बचावले.रात्री १० वाजेच्या दरम्यान उमेदवार सुशिलकुमार पावरा यांची गाडी साव-यादिगर भागातील डोंगराळ भागात अडकली.तोरणमाळ हून भोमणे, साव-यादिगर, खडकी, झापी, बाबर,बिलगाव या नर्मदाकिनारी असणा-या दुर्गम भागात प्रचार सुरू असतांना हा प्रकार झाला.प्रचारात सोबत असणा-या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने रात्री टायर बदलण्यात आले.टू व्हीलर वरील कार्यकर्ते या रस्त्यावर पाच वेळा पडले,तेही जखमी झाले.प्रचारात बिरसा फायटर्सचे धडगांव तालुकाध्यक्ष सुनिल तडवी, दारासिंग वळवी, गौतम पटले, गिरधर पावरा,जहांगीर पावरा,संजय ठाकरे, समीर पाडवी, अक्षय पावरा,आपसिंग पावरा, इशू पावरा,अविनाश पावरा,अरूण पावरा,मयूर पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
धडगांव तालुक्यातील साव-यादिगर हा भाग पूर्ण पणे दुर्लक्षित आहे.या भागात अजूनही रस्ते झाले नाहीत, त्यामुळे येथील लोकांपर्यंत पोहचणे खूप अडचणीचे आहे .या भागात कोणी अधिकारी वा आमदार, खासदार, मंत्री जात नाहीत. म्हणून या भागात सध्या निवडणूक लढविणारे सर्व उमेदवारांनी गेले पाहिजे. तेव्हाच येथील लोकांचे दु: ख व अडचणी समजतील. एसीत बसून करोडपती उमेदवारांना येथील लोकांच्या अडचणी समजणार नाहीत. पूर्वीच्या आमदार, खासदार यांनी या भागात अजिबात लक्ष दिले नाहीत, म्हणून या भागात रस्ते नाहीत. करोडपती उमेदवारांना मतदान करू नका, माझ्यासारख्या सर्वसामान्य व गरीब उमेदवारांना मतदान करा, माझ्या रिक्षा चिन्हासमोरील बटन दाबुन मला आपल्या सेवेची संधी द्या,असे आवाहन अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनी केले.
0 Comments