Advertisement

पहिले आमदार, खासदार व मंत्री असणा-यांना घरी बसवा- सुशिलकुमार पावरा


पहिले काय करू शकले नाहीत, आता निवडून काय दिवे लावतील?

धडगांव प्रतिनिधी: पहिले आमदार, खासदार व मंत्री असणारे पहिले अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचा विकास करू शकले नाहीत, आता निवडून काय विकास करतील?काय दिवे लावतील?म्हणून पहिले आमदार, खासदार,मंत्री पदावर व सत्तेवर असतांना हे करोडपती उमेदवार मतदारसंघात विकास करू शकले नाहीत, आता फक्त जनतेची दिशाभूल करून पुन्हा जनतेला लुटायला निवडणूकीत उभे राहिले आहेत, म्हणून यांना आता घरीच बसवा,अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.
        ३५ वर्षे आमदार असणारे माजी आदिवासी विकास मंत्री हे पुन्हा काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी करीत आहेत, त्यांना स्वत: च्या गांवाचा रस्ता अजून बनवता आला नाही.मतदारसंघात जिकडे तिकडे खड्डेमय रस्ते आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी रस्त्यांची अवस्था आहे.एकही उद्योग ,कारखाना,रोजगार आणू शकले नाही.आदिवासींचे मजूरीसाठी स्थलांतर वाढले आहे. बाम्बुलन्स मध्ये गरोदर महिलांनी डिलीवरीसाठी नेले जाते.अक्कलकुवा मतदारसंघ अनेक समस्यांनी ग्रस्त आहे.
                      डाॅ.हिना गावित हे १० वर्षे खासदार होत्या.त्यांना भाजपने पक्षाची तिकीट दिली नाही, म्हणून अपक्ष उमेदवारी करीत आहेत. त्यांनीही या भागात खासदार असतांना दुर्लक्ष केले.लोकसभेत त्यांचा पराभव झाला.गॅस सिलेंडर वाटले,सिलींडर १२०० रूपयांच्या वर गेले.त्यामुळे त्यांची गॅस शेगडी सिलींडर महागल्यामुळे बंदच आहे. काँग्रेस मधून भाजपात गेलेले व आता नाईलाजास्तव भारत आदिवासी पार्टी तर्फे लढणारे पद्माकर वळवी हे काँग्रेसचे १५ वर्षे आमदार होते,क्रीडा मंत्रीही होते.त्यांनी अक्कलकुवा मतदारसंघासाठी काय केले?
                     विधानपरिषदेचे विद्यमान आमदार आमशा पाडवी हे सुद्धा आमदारकीची ३ वर्षे बाकी असतांना पुन्हा उमेदवारीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांना डावलून स्वतःच शिवसेनेची उमेदवारी करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याच पक्षातील कार्यकर्ते अस्था व्यस्थ आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटात असतांना आमशा पाडवी यांना मानणारा गट मोठा होता, त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांची पहिले सारखी हवा नाही.सारखे पक्ष बदलणा-या उमेदवारांवर लोकांचा विश्वास राहिला नाही. काँग्रेसचे के सी पाडवी,भाजपच्या हिना गावित, आदिवासी पार्टीचे पद्माकर वळवी व शिवसेनेचे आमशा पाडवी हे पहिले आमदार, खासदार व मंत्री असणारे करोडपती उमेदवार आहेत. यांना गरीबांचे दु: ख ए.सी .गाडीत बसून कळणार नाही.म्हणून यांना आता घरीच बसवा,माझ्यासारख्या नवीन अपक्ष उमेदवारांना निवडून सेवेची संधी द्या,असे आवाहन बिरसा फायटर्स संघटनेचे अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments