पैसे वाटणा-यांविरोधात बिरसा फायटर्सची मोहीम
पैसे वाटणा-यांचे फोटो व विडीओ बिरसा फायटर्सकडे पाठवा
धडगांव प्रतिनिधी : प्रिय मतदार बंधू भगिनी,सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे.काही पक्षांचे उमेदवार हे मतदारांना खोटी आश्वासने दाखवतील, पैशांची लालूच दाखवतील, कोणत्याही आमीषाला बळी पडू नका.आपले मत अमूल्य आहे.ते पैसे वाटणा-या उमेदवारांना देऊ नका.पैसे वाटणा-यांविरोधात बिरसा फायटर्सची मोहीम सुरू आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत नंदूरबार जिल्ह्य़ातील शहादा तालुक्यातील भोंगरा व जाम या गांवातील काही भाजप कार्यकर्त्यांनी मतदारांना खुलेआम पैसे वाटले.त्यांच्या विरोधात मी जिल्हाधिकारी नंदुरबार तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली.निवडणूक आयोगाकडेही तक्रार दाखल केली.पैसे वाटणा-यांचे विडीओ सोशल मिडीयावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वायरल झाले.त्यामुळे त्यांची खूप बदनामी झाली,त्यांची इज्जत गेली.त्यांनी स्वतःची इज्जत घालवली,त्याचबरोबर गांवाचीही इज्जत घालवली.म्हणून पैसे वाटणा-यांनी शंभर वेळा विचार करा,तुमची एकदा इज्जत गेली तर ती परत येणार नाही.पैसे गेले तर तुम्ही परत कमवू शकता.परंतु एकदा बदनामी झाली तर ती वापस येणार नाही.
पैसे वाटणारे उमेदवार हे त्यांचा काळा पैसा वाटतात,हरामीचा पैसा वाटतात. जनतेकडून लुटलेला पैसा वाटतात. भ्रष्ट उमेदवार निवडून दिले तर ते वाटलेले पैसे वसूल करतात. भ्रष्ट उमेदवार कधीच मतदारसंघाचा विकास करू शकत नाहीत. १००,२०० रूपयांत आपले अमूल्य मत विकू नका,स्वतःला विकू नका.
पैसे वाटणारे हे मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच १९ तारखेच्या रात्री पैसे वाटतील. प्रत्येक गांवात १०-२० तरूणांचा ग्रूप बनवा.गल्ली गल्लीत दोघा दोघांनी पहारा करा.पैसे वाटणा-यांचे फोटो,विडीओ काढा .ते फोटो विडीओ निवडणूक निर्णय अधिका-याकडे पाठवा.बिरसा फायटर्स टिमकडे पाठवा.प्रत्येक तालुक्यात बिरसा फायटर्स कार्यकर्ते आहेत, त्यांना कळवा. आम्ही कारवाई करायला भाग पाडू.पैसे आगाऊपणा करत असतील तर त्यांना घरात बांधून ठेवा व पोलिसांच्या हवाली करा. ऐकत नसतील तर घरात बांधून ठोका,झोडा. पोलिसांच्या ताब्यात द्या.पक्षांच्या उमेदवारांनी लावलेली ही भ्रष्टाचाराची कीड पूर्ण पणे नष्ट करा.आपल्याला भ्रष्ट व्यवस्था बदलायची आहे,परिवर्तन घडवून आणायचे आहे.चला पैसे वाटणा-यांना धडा शिकवूया, लोकशाही वाचवूया.अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा तथा अपक्ष उमेदवार अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघ यांनी दिली आहे.
यावेळी बिरसा फायटर्सचे धडगांव तालुकाध्यक्ष सुनिल तडवी, दारासिंग वळवी, गौतम पटले, गिरधर पावरा,जहांगीर पावरा,संजय ठाकरे, समीर पाडवी, अक्षय पावरा,आपसिंग पावरा, इशू पावरा,अविनाश पावरा,अरूण पावरा,मयूर पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments