Advertisement

राजा रावण दहन प्रथा बंद करा- बिरसा फायटर्स

रावण दहन करणा-यांवर ॲस्ट्रासिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी
  
शहादा प्रतिनिधी: येत्या विजयादशमीला म्हणजेच दस-याला राजा रावण दहन करू नका,गोंड समाजातील महात्मा रावण दहन प्रथा बंद करा व रावण दहन करणा-यांवर ॲट्रासिटी अंतर्गत lPC ची धारा १५३ (अ) २९५,२९५ अ) आणि २९८ अनुच्छेद नुसार कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री ,जिल्हाधिकारी नंदुरबार व पोलीस अधीक्षक नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,शहादा तालुका संघटक राजू ठाकरे,नंदुरबार शहराध्यक्ष रणजित ठाकरे,योगेश चव्हाण, महेंद्र नाईक, गोविंद पाडवी,आकाश तिरसे आदि आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते.
                       न्यायप्रिय महात्मा राजा रावण हा आदिवासी समुदायाचा महानायक परमपूज्यनीय आहे.हजारो वर्षापासून आदिवासी समुदाय त्यांची पुजा करतात. त्यांना महानायक ,शूरवीर, योद्धा, महाज्ञानी शक्तीशाली व शंभूचा पुजारी मानतात .आज ही महात्मा रावणाची पुजा मेघनाथ मध्ये करतात. तमिळनाडू मध्ये राजा रावणाचे ३५२ मंदिरे आहेत .सर्वात मोठी मुर्ती मध्यप्रदेशात मंदसौर इथे अंदाजे १५ मीटर उंचीची आहे.
                      छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड आणि महाराष्ट्रात ही अमरावती जिल्ह्यातील मेळघाटसह सर्वत्र राजा रावणाची पूजा केली जाते.अशा या महान राजाला काही मनुवादी षडयंत्रकारी व्यवस्थेने बदनाम करण्याचा कोणताही कसूर ठेवला नाही. खलनायक म्हणून प्रसिद्ध केले आहे. रावण हे आदिम संस्कृतीचे श्रध्दास्थान व दैवत आहे. १९३० पासून महात्मा रावण ला मनुवादी यांनी जाळायला सुरुवात केली होती. मनुवादी लोकांनी राजा रावण ला अपमानित उपरोधिक नावाने राक्षस संबोधून जाळायला सुरुवात केली. त्यामुळे आदिवासी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात व येणाऱ्या पिढीमध्ये ही संताप निर्माण होणे व पेटवून देण्याची भावना कायम रूजून राहते. समाजामध्ये शांती, सुरक्षा, भाईचारा, समता, न्याय, बंधुता कायम ठेवण्यासाठी प्रत्येकांच्या धार्मिक भावना व देवा देवतांच्या आदर्श महामानवांना वंदन करण्याच्या, सन्मान करण्याचा संविधानाच्या अधिकार २५ नुसार प्रत्येक व्यक्तीस आहे व स्वातंत्र्य आहे. या प्रथेमुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातात म्हणून रावण दहन प्रथा बंद करण्यात यावे. कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात येऊ नये .तरी दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करण्याचा प्रयत्न केला गेला तर बिरसा फायटर्स या सामाजिक संघटनेकडून तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करण्यात येईल, याची प्रशासने नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments