शहादा प्रतिनिधी: बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी हे शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहेत. निवडणूक लढण्यासाठी गोपाल भंडारी यांनी दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी शहादा कार्यालयातून ०२ नामनिर्देशन फाॅर्म शहादा विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे,गोपाल भंडारी हे शहादा तालुक्यातील शहाणा या गांवाचे मूळ रहिवाशी आहेत.
बिरसा फायटर्स पुरस्कृत युवा,तडफदार, दमदार व लढाऊ अपक्ष उमेदवार मा.गोपाल सुरेश भंडारी यांचा ०२-
शहादा विधानसभा मतदारसंघातला पुरुषोत्तम नगर- डोंगरगाव येथील साखर कारखाना बंद पडला आहे,होळ मोहिदा येथील सुतगिरणी बंद पडली आहे, त्यामुळे हजारों कामगार बेरोजगार पडले आहेत, या भागातून दरवर्षीच लाखों आदिवासी बांधव मजूरीसाठी गुजरात मध्ये स्थलांतर करतात, हे स्थलांतर रोखण्यासाठी,रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी, विविध क्षेत्रातील भ्रष्टाचार बंद करण्यासाठी, वनदावे १०० टक्के मंजूर करण्यासाठी,शेतक-यांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी अशा एकूणच शहादा मतदारसंघ संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एक लढाऊ व दमदार, लोकांची कामे करून देणारा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला आहे.
आजी व माजी आमदार जो विकास करू शकले नाहीत, तो विकास आमचा उमेदवार करून दाखवेल. आम्ही फक्त सामाजिक कार्याच्या जोरदार ही निवडणूक लढवित आहेत. पक्षांचे उमेदवार मतदारांना पैसे वाटतील,विविध आमीश दाखवतील, परंतु त्यांच्या आमीशाला बळी पडू नका,आपले अमूल्य मत हे बिरसा फायटर्सच्या अपक्ष उमेदवारालाच द्या.पैसे वाटणारे उमेदवार हे त्यांचा हरामीचा पैसा वाटतात,जनतेकडून लुटलेला पैसा वाटतात. भ्रष्ट व लुटारू उमेदवार कधीच मतदारसंघाचा विकास करू शकत नाहीत.
पेसा भरतीचा विषय असो की धनगरांना आदिवासींत शामिल करण्याचा मुद्दा असो किंवा वनदाव्यांचा विषय असो ,आमचा उमेदवार हा रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा आहे,ठिक ठिकाणी प्रशासनास निवेदन देणारा आहे, लोकांची कामे करून देणारा आहे.म्हणून शहादा विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही दमदार व लढाऊ उमेदवार उतरवला आहे.शहादा विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनींना मी जाहीर आवाहन करितो की, बिरसा फायटर्स पुरस्कृत अपक्ष उमेदवार मा.गोपाल सुरेश भंडारी यांना प्रचंड बहूमतांनी विजयी करा!
0 Comments