धडगांव प्रतिनिधी: बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा हे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहेत. निवडणूक लढण्यासाठी सुशिलकुमार पावरा यांनी दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी अक्कलकुवा कार्यालयातून २ नामनिर्देशन फाॅर्म विकत घेतले आहेत. सुशिलकुमार पावरा हे धडगांव तालुक्यातील चूलवड या गांवाचे मूळ रहिवाशी आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत नंदूरबार लोकसभा मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती आणि अनेक पक्षांच्या उमेदवारांना मागे टाकत थेट चौथ्या क्रमांकावर मते मिळवत आपली चांगली छाप सोडली होती.
अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात सुशिलकुमार पावरा यांच्या कार्याला व बिरसा फायटर्स ग्रुपला मानणारा मोठा सुशिक्षित वर्ग आहे.अक्कलकुवा मतदारसंघात बिरसा फायटर्स संघटनेच्या अनेक गाव शाखा आहेत. त्यामुळे या मतदारसंघात सुशिलकुमार पावरा यांची फिक्स वोटींग आहेत. ५०५ वेळा उपोषण करणारा भारतातील एकमेव व्यक्ती म्हणून सुशिलकुमार पावरा यांची विशेष ओळख आहे. इंटरनॅशनल आयडॉल, राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स, राष्ट्रीय कलामित्र,शिक्षक, लेखक, कवी,पत्रकार, गायक, नृत्यक, कराटेपटू असा अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणूनही सुशिलकुमार पावरा यांची ओळख आहे. अक्कलकुवाचे मतदारसंघाचे ३५ वर्षे विद्यमान आमदार के.सी.पाडवी यांना हरवणे हेच आपले एकमेव लक्ष्य आहे,म्हणत सुशिलकुमार पावरा हे अक्कलकुवा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.आता हवा आमदार नवा म्हणून सुशिलकुमार पावरा यांना या मतदारसंघातून जोरदार पसंती मिळत आहे.
0 Comments