रावेर:- आज रोजी सर्वांचे सहमती ने बिरसा फायटर्स यावल तालुकाध्यक्ष मा.गफुर अरमान तडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, मा.गफुर तडवी यांनी बिरसा फायटर्सचे समाजासाठी रात्रंदिवस कार्य बघून त्यांनी बिरसा फायटर्स या सामाजिक संघटना मध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती,
तेव्हा बिरसा फायटर्सचे कमिटीने या विषयावर चर्चा करुन मा.गफुर अरमान तडवी यांची यावल तालुकाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, मा.गफुर अरमान तडवी यांना बिरसा फायटर्स कशाप्रकारे समाजातील विविध कार्य करते हे त्यांना सांगण्यात आले
आदिवासी समाजाच्या हितासाठी, सर्वांगीण विकासासाठी, सर्वांगीण प्रगतीसाठी, आदिवासी अस्तित्व, अस्मिता, जल, जंगल, जमीन संरक्षणासाठी, आदिवासी संस्कृती, संवर्धनासाठी संविधानिक हक्क व अधिकार, आरक्षण वाचविण्यासाठी, आदिवासींवर होणा-या अन्याय अत्याचार विरोधात निवेदन देणे, पाठपुरावा करणे, प्रसंगी मोर्चा, आंदोलन, उपोषण करणे इत्यादी लोकशाही मागणी लढा देणे, न्यायिक लढाई लढणे, आदिवासी क्रांतीकारकांचे विचार जनमानसात पोहचवण्यासाठी एका वैचारिक व सामाजिक चळवळ लढाई लढण्यासाठी संघटनेची आवश्यकता होती. आदिवासी समाजाची ही गरज लक्षात घेऊन बिरसा फायटर्स या वैचारिक व सामाजिक लढाऊ संघटनेची निर्मिती केली आहे.असे बिरसा फायटर्सचे कार्य पटवून दिले
बिरसा फायटर्स संघटनेत आपण सहभागी होऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे आपली बिरसा फायटर्स यावल *तालुकाध्यक्ष* या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे. आपण संघटनेशी एकनिष्ठ राहून काम कराल व आपल्याकडून संघटनेची बदनामी किंवा अहित होणार नाही अशी अपेक्षा आहे.आपली *तालुकाध्यक्ष* या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा!
!!! उलगुलान जारी है और जारी रहेगा !!!
0 Comments