Advertisement

शहादा ते लिंबर्डी बससेवा सुरू करा-बिरसा फायटर्सची मागणी

शहादा प्रतिनिधी- शहादा ते लिंबर्डी बससेवा नियमितपणे सकाळ व संध्याकाळ अशा २ फे-या सुरू करा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून आगार प्रमुख बस आगार शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,लिंबर्डीचे विजय ओंकार पावरा, आर्यन चव्हाण, राज पावरा व असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
                         शहादा ते लिंबर्डी बस सकाळी ९.३० वाजता व संध्याकाळी ६.०० वाजता अशी बससेवा सकाळ व संध्याकाळ २ फे-या नियमित पणे सुरू होती.सदर बससेवा बंद करण्यात आलेली आहे.त्यामुळे लिंबर्डी येथील शाळकरी मुलांना, दवाखान्यात जाणा-या रूग्णांना, गांवातील नागरिकांना प्रवासाची गैरसोय निर्माण झाली आहे.शाळकरी मुले पायी चालत शाळेत जातात. रुग्णांनाही खाजगी वाहनांमधून जावे लागते. गांवातील नागरिकांना नाईलाजास्तव खाजगी वाहनांतून प्रवास करावा लागतो. बस मधला प्रवास हा प्रवाशांसाठी सुरक्षित प्रवास असतो.खाजगी वाहनांतील प्रवास हा धोकादायक असतो. शिवाय खाजगी वाहन चालक हे प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडे घेऊन लुटमार करतात. म्हणून गांवातील नागरिकांची एकंदरीत गैरसोय लक्षात घेऊन शहादा ते लिबर्डी नियमितपणे सकाळी व संध्याकाळी बससेवा सुरू करावी.हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments