शहादा प्रतिनिधी- शहादा तालुक्यातील पेसा अंतर्गत येणा-या एकुण २१ गांवांना महसूली दर्जा मिळावा व स्वतंत्र ग्रामपंचायत करा, या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा व गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहेत.सदर निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांनाही पाठविण्यात आले आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, नाशिक विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी,रमेश पटले,रवींद्र पटले,मुन्ना पावरा, सुरज ठाकरे,सुरेश ठाकरे,ललित शेवाळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
शहादा तालुक्यातील पेसा अंतर्गत येणा-या शहाणे येथील बर्डीपाडा , वडगांव येथील कोळपांढरी, नागझिरी येथील अंधारपाडा,कन्साई येथील जुनी निंबर्डी,आंबापाणी पाडा,सातपिंप्री पाडा,मालपूर पाडा,विरपूर येथील चिंचोरा पाडा,मलगांव येथील पिपल्यापाडा, गुर्हाडपाणीपाडा, नवानगर येथील बर्डीपाडा, रामपूर येथील रामपूर प्लाॅट, गोदिपूर येथील नवापाडा, चिखली बुद्रुक येथील चिखली पुनर्वसन पाडा,काथर्देदिगर येथील काथर्देदिगर पुनर्वसन,चांदसैली येथील घोडलेपाडा, लंगडीभवानी येथील घोटाळीपाडा, टेंभली येथील आसूस, होळ गुजरी,टुकी येथील सोनवल, लोहारा येथील कलमाडी तह तिजारे अशा एकूण २१ गावांना महसूली दर्जा मिळणे व स्वतंत्र ग्रामपंचायत करून मिळणेसाठी सक्षम गांवांची यादी सोबत जोडत आहोत. सदर गांवांची एकुण लोकसंख्या १२०० व २००० पेक्षा अधिक आहे. परंतु या गावांना महसूली दर्जा नसल्याकारणाने व स्वतंत्र ग्रामपंचायत नसल्याकारणाने राज्य व केंद्र सरकार कडून मिळणा-या योजनांचा सामूहिक व वैयक्तिक लाभ योग्य रित्या मिळत नाहीत.या गांवात १०० टक्के अनुसूचित जमातीचे ,आदिवासी समाजाचे रहिवाशी राहत असून अनेक शासकीय योजनांपासून रहिवाशांना वंचित राहावे लागते. या गावांना महसूली दर्जा मिळाल्यास व स्वतंत्र ग्रामपंचायत करून मिळाल्यास रहिवाशांना अनेक सोयी सुविधांचा लाभ मिळून जीवनमान उंचावेल. म्हणून शहादा तालुक्यातील पेसा अंतर्गत येणा-या या २१ गावांना महसूली दर्जा मिळावा व स्वतंत्र ग्रामपंचायत करून मिळावे, हीच नम्र विनंती.अन्यथा या मागणीसाठी बिरसा फायटर्स संघटनेकडून आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे
0 Comments